पुणे । सीएपीडी लाइफसेव्हर्स, सीएमडीए वॉर्डविझ या संघांनी पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून, मुख्य प्रायोजक सिस्का आणि सहप्रायोजक शॉ टोयोटा,गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या लढतीत लाइफसेव्हर्स संघाने मेकॅट्रॉनिक पीसीपीडीए संघावर ५ धावांनी मात केली. लाइफसेव्हर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ८७ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मेकॅट्रॉनिक संघाला ६ बाद ८२ धावाच करता आल्या.
दुस-या लढतीत वॉर्डविझ संघाने फॅशन फायटर्स संघावर २८ धावांनी मात केली. यात वॉर्डविझ संघाने निर्धारित १० षटकांत ५ बाद ११८ धावांपर्यंत मजल मारली. यात संतोष भेलकेने २८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. फायटर्स संघाला ७ बाद ९० धावाच करता आल्या. इतर लढतींत मेपल प्लाय मास्टर्स संघाने पाईन पँथर्स संघावर ३१ धावांनी विजय मिळवला, तर पिस्मा इलेव्हन संघाने पाडा वॉरियर्सवर १७ धावांनी मात केली.
संक्षिप्त धावफलक – १) लाइफसेव्हर्स – १० षटकांत ५ बाद ८७ (कमलेश मुथा नाबाद ३२, गणेश साळुंके २५, नीलेश शहा २-१२) वि. वि. मेकॅट्रॉनिक – १० षटकांत ६ बाद ८२ (आनंद बरमुख २३, नीलेश शहा १६, राकेश गुजराथी २-७).
२) वॉर्डविझ – १० षटकांत ५ बाद ११८ (संतोष भेलके ५३, प्रफुल मानकर ३३, प्रतीक गांधी २-१०) वि. वि. फॅशन फायटर्स – १० षटकांत ७ बाद ९० (राकेश छाजेड २६, विक्रम कांबळे १५, अजय झंवर २-६, संतोष भेलके २-१६)
३) मेपल प्लाय मास्टर्स – १० षटकांत ४ बाद ९२ (श्रेय शहा ४२, कौशिक शहा नाबाद १७, नितेश ओसवाल १-८) वि. वि. पाईन पँथर्स – १० षटकांत ५ बाद ६१ (नितीन ओसवाल १७, मनीष शहा १६, विपूल ओसवाल २-७, विराल पटेल १-५).
४) पिस्मा इलेव्हन – १० षटकांत ५ बाद ८८ (ऋषभ बन्सल नाबाद ३३, अल्ताफ मेमन २८, गौरव शहा २-२५) वि. वि. पाडा वॉरियर्स – १० षटकांत ३ बाद ७१ (रोहन चंकेश्वरा नाबाद १७, अनुप पट्टानी १५, भावेश सुराना २-२१).
५) मेटल चॅलेंजर्स – १० षटकांत ७ बाद १०१ (मनोज राठोड ४६, श्रीधर बरोट २८, प्रकाश ओसवाल ४-१५, अतुल ओसवाल २-२०) वि. वि. नॉन-फेरस इलेव्हन – १० षटकांत ८ बाद ६९ (मोनिक पोरवाल २१, श्रीधर बरोट २-१०).