शेवटच्या टी20 विश्वचषकात भारतानं चमकदार कागगिरी केली. भारतानं एकही सामना न गमावता टी20 विश्वचषकाची ट्राॅफी नावावर केली. तत्पूर्वी आपण टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची नाव पाहणार आहोत. आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना धुमाकूळ घातला. पण त्यांच्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोहली, बाबर नसून कोणी दुसराच आहे.
टी20 विश्वचषकाआधी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत विराट कोहली (Virat kohli) अव्वल स्थानावर होता. पण विश्वचषक झाल्यानंतर त्याची घसरण झाली आणि भारताचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) मुसंडी मारली. रोहित टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यानं कोहली आणि बाबरला पाठीमागे सोडले. टी20 विश्वचषकानंतर कोहली आणि रोहितनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण बाबर आझम (Babar Azam) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे यादीत काही दिवसांनी बदल पाहायला मिळू शकतो.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी (19 सप्टेंबर 2007) रोजी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं होतं. तेव्हापासून निवृत्ती घेईपर्यंत त्यानं भारतासाठी 159 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 4,221 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 32.05 आणि स्ट्राईक रेट 140.89 राहिला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 32 अर्धशतक आणि 5 शतक झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 121 आहे.
विराट कोहलीच्या (Virat Kohli) टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 2010 मध्ये भारतासाठी पदार्पण केलं होतं. त्यानं 125 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 4,188 धावा केल्या. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 48.69 राहिली आणि स्ट्राईक रेट 137.04 राहिला. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 38 अर्धशतक आणि 1 शतक झळकावलं आहे. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 122 राहिली आहे.
बाबर आझमच्या (Babar Azam) टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं पाकिस्तानसाठी 2016 मध्ये पदार्पण केलं होतं. तो पाकिस्तानसाठी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं 123 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 41.03च्या सरासरीनं 4,145 धावा केल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 36 अर्धशतक आणि 3 शतक झळकावले आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 122 आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो रोहित, विराटनंतर तिसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे नेहमीसाठी बंद? माजी क्रिकेटर म्हणाला, “गंभीर असतानाही…”
SA20: कार्तिक, राशिद खान, कॉनवेसारखे स्टार खेळाडू सहभागी! कधी होणार स्पर्धा?
विनेशमुळे भारताचे नुकसान, कुस्तीमध्ये 4 पदके गमावली? WFI अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ