रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळला गेला. पाकिस्तान आणि इंग्लंड संघ विश्वचषकातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. अंतिम सामन्यात इंग्लंडचे गोलंदाजी आक्रमण जबरदस्त प्रदर्शन करताना दिसले. अष्टपैलू सॅम करन याने संघासाठी किफायतशीर गोलंदाजी केली. यादरम्यान तो विश्वचषकाच्या एका हंगामात इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील बनला.
इंग्लंड संघाचे गोलंदाजी आक्रमण तसे पाहिले तर, नेहमीच उत्कृष्ट राहिले आहे. पाकिस्तानविरुद्ध रविवारी खेळलेल्या अंतिम सामन्यात देखील इंग्लिश गोलंदाजांनी कमाल प्रदर्शन केले. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर या सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मर्यादित 20 षटकांमध्ये पाकिस्तानने 8 विकेट्सच्या नुकसानावर 137 धावा केल्या. इंग्लंडसाठी सॅम करन सर्वात किफायतशीर ठरला. त्याने टाकलेल्या चार षटकांमध्ये अवघ्या 12 धावा खर्च केल्या आणि तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. पाकिस्तानविरुद्ध खेळताना या सामन्यात त्याने पहिली विकेट सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याची घेतली आणि एक खास विक्रम नावावर केला.
टी-20 विश्वचषकाच्या एका हंगामात आता सॅम करन (Sam Curran) इंग्लंडसाठी सर्वात जास्त विकेट्स गेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने यावर्षीच्या टी-20 विश्वचषकात एकूण 13 विकेट्स घेतल्या आणि यादीत पहिला क्रमांक मिळवला. यापूर्वी टी-20 विश्वचषकाच्या एका हंगामात इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी रायन साईडबॉटम (Ryan Sidebottom) याने 2010 साली केली होती. रायनने या हंगामात एकूण 10 विकेट्स घेतल्या होत्या आणि आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर ग्रिम स्वान (Graeme Swann) आहे, ज्यांनी 2010 साली खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात इंग्संडसाठी 10 विकेट्स घेतले होते. यादीत चौथ्या क्रमांकावर डेविड विले (David Willey) आहे, ज्याने 2010च्या विश्वचषकातच 10 विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडसाठी टी-20 विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
13 – सॅम करन (2022)
10 – रियान साईडबॉटम (2010)
10 – ग्रिम स्वान (2010)
10 – डेविडल विले (2010)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आदिल रशिदने बाबर आझमला कसे आपल्या जाळ्यात फसवले एकदा पाहाच, आयसीसीने शेयर केला व्हिडिओ
लाईव्ह शोमध्ये का रडला शोएब मलिक? पत्नी सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या चर्चांना उधाण