आज झालेल्या (१४ ऑक्टोबर) शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचने युवा टेनिसपटू बोर्ना कोरिचला ६-३, ६-४ असे पराभूत करत त्याचे ३२वे एटीपी वर्ल्ड मास्टर्स १०००चे विजेतेपद पटकावले आहे.
पहिल्या सेटमध्ये २५व्या मिनिटाला जोकोविचने ४-२ अशी आघाडी घेतली होती. त्याने ३८व्या मिनिटालाच हा सेट आपल्या नावे केला. मात्र यावेळी त्याला चार सर्व्हीस पॉइंट्स गमवावे लागले. तर कोरिचनेही त्याचा अप्रतिम खेळ केला.
दुसऱ्या सेटमध्ये कोरिचने आक्रमक सुरूवात करत चार ब्रेक पॉइंट्स वाचवले. पण जोकोविचने तेवढ्याच ताकदीने हा सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. एक तास ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात शेवटी जोकोविचनेच बाजी मारली.
यावर्षी विम्बल्डनमध्ये दुखापतीनंतर पुनरागमन करताना जोकोविचने त्याचा विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. त्याने सलग १८ सामन्यात विजय मिळवला असून तर २७ सामने जिंकले तर १ सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
उपांत्य फेरीत जोकोविचने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवला पराभूत केले. तर कोरिचने उंपात्य फेरीत दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररवर विजय मिळवत दिमाखात त्याच्या पहिल्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
जोकोविचने विम्बल्डन बरोबरच युएस ओपन आणि सिनसिनाटी मास्टर्सचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच त्याने २०१२, २०१३ आणि २०१५ला शांघाय मास्टर्सचे विजेतेपद मिळवले आहे.
हा सामना जिंकल्याने जोकोविचने १००० एटीपी पॉइंट्स मिळवत कारकिर्दीतील ७२वे विजेतेपद पटकावले आहे. तर कोरिचलाही ६०० पॉइंट्सचा फायदा झाला आहे.
Simply unstoppable. pic.twitter.com/HzVgNFYy0a
— ATP Tour (@atptour) October 14, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–बर्थ-डे बाॅय गंभीरचा वाढदिवसालाच क्रिकेटमधील ‘गंभीर’ विक्रम
–केवळ या कारणांमुळे पृथ्वी शाॅला वन-डेत संधी हवीच…