मँचेस्टर| इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना काल(११ सप्टेंबर) मँचेस्टरमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १९ धावांनी विजय मिळवला. पण हा सामना ऑस्ट्रेलियाला स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ शिवाय खेळावा लागला. कारण स्मिथला सरावाच्या वेळी एक चेंडू डोक्यावर आदळल्याने दुखापत झाली आहे.
त्यामुळे खबरदारी म्हणून त्याला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. गुरुवारी ही घटना घडली जेव्हा कोचिंग स्टाफमधील एक सदस्य नेटमध्ये चेंडू फेकत होता आणि त्याचवेळी एक चेंडू स्मिथच्या डोक्याला लागला.
ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की स्मिथच्या स्थितीबद्दल चौकशी केली जात आहे. परंतु, मालिकेच्या दुसर्या आणि तिसर्या सामन्यासाठी स्मिथ उपलब्ध होईल की नाही हे त्यांनी सांगितले नाही.
आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझी आणि त्याच्या चाहत्यांना आशा असेल की दुखापत गंभीर नसावी. जर हा खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला तर तो राजस्थानसाठी मोठा धक्का ठरेल, कारण तो संघाचा कर्णधारही आहे.