रियल माद्रिद स्टार खेळडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव पोर्तुगाल मधील विमानतळाला देण्यात आले आहे. रियल माद्रिद संघाकडून खेळणारा आंतरराष्ट्रीय सुपरस्टार ख्रिस्तियानोने बुधवारी पोर्तुगालचे अध्यक्ष आणि प्रधानमंत्री यांच्या सोबत माद्रिद आयलॅण्ड येथील विमानतळावरील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
३२ वर्षीय ख्रिस्तियानो हा लोकल स्टार असून , त्याच्या नावावर आधीच तिथे हॉटेल व संग्रहालय आहेत, तसेच त्याचा पुतळा देखील आहे.
या कार्यक्रमामध्ये बोलताना ख्रिस्तियानो म्हणाला “मला माझ्या देशाचा खूप आभिमान आहे, आणि मी माझ्या मुळाशी जोडलेला आहे आणि राहणार. माझ्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे की माझे नाव एका विमानतळाला देण्यात येत आहे”.
रोनाल्डोने आता पर्यंत १३८ सामने आपल्या देशासाठी खेळले आहेत आणि त्यात त्याने ७१ गोल केले आहेत. २०१६च्या युरो कपचे विजेतेपद मिळवले म्हूणन विमानतळाला ख्रिस्तियानोचे नाव देण्यात आले आहे. या आधीही फुटबॉलपटूचे नाव विमानतळाला देण्यात आले होते, ते म्हणजे २००६ मध्ये, नोर्देन आयर्लंड मध्ये ‘जीवर्ज बेस्ट बेलफेस्ट सिटी एअरपोर्ट’ असे नाव मँचेस्टरच्या खेळाडूच्या सन्मानार्थ देण्यात आले होते. पण जिवंत असतानाच असे काही होयची ही पहिलीच वेळ.