इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच तिसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाकडे मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या २५ ऑगस्ट पासून हेडींग्लेच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला २-० ची विजयी आघाडी घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघाला असा कारनामा करण्यात यश आले तर, १९८६ नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये दोन कसोटी जिंकू शकणार आहे.
भारतीय संघाने जेव्हा सलग २ कसोटी सामन्यात विजय मिळवला होता, त्यावेळी कपिल देव भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यावेळी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २७९ धावांनी विजय मिळवला होता. तसेच तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.(Virat Kohli has an opportunity to win back to back two test in England after 35 years)
भारतीय संघाला इंग्लडमध्ये ३ वेळेस कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे. भारताने पहिल्यांदा १९७१ मध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका १-० ने आपल्या नावावर केली होती. त्यावेळी अजित वाडेकर संघाचे कर्णधार होते. त्यानंतर १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला होता. तसेच राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये भारतीय संघाने १-० ने विजय मिळवला होता.
सध्या इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून १-० ची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है!! सूर्या अन् पृथ्वीची कॉमेडी पाहून तुम्हीही खदखदून हसाल
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची पुन्हा बिघडली तब्येत, अर्ध्यातून सोडावा लागला कार्यक्रम