भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी १७ जुलै रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यातून भारताचा इंग्लंड दौराही संपणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी काही मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतात. मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारताने पहिला वनडे १० गडी राखून जिंकून यजमानांवर वर्चस्व गाजवले, परंतु लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले आणि भारताचा १०० धावांनी पराभव केला. मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. चला जाणून घेऊया मँचेस्टर वनडेमध्ये रोहित आणि शमी कोणते विक्रम करणार आहेत
मोहम्मद शमीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा विक्रम
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडण्याच्या तयारित आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत खेळलेल्या ४६३ सामन्यांमध्ये १५४ विकेट घेतल्या. दुसरीकडे, मोहम्मद शमीने आतापर्यंत १५२ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. शमीने मँचेस्टर एकदिवसीय सामन्यात तीन विकेट घेतल्यास तो सचिनचा विक्रम मोडेल आणि भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत १२व्या क्रमांकावर पोहोचेल. अनिल कुंबळेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून ३३४ विकेट घेतल्या आहेत.
रोहित शर्माला मोहम्मद अझरुद्दीनच्या पुढे जायला आवडेल
भारतीय कर्णधार रोहित शर्माने मँचेस्टर वनडेमध्ये २० धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकेल. अझरुद्दीनने या फॉरमॅटमध्ये खेळलेल्या ३३४ सामन्यांमध्ये ३६.९२ च्या सरासरीने ९३७८ धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने २३२ सामन्यांमध्ये ९३५९ धावा केल्या आहेत. रविवारी रोहितने असे केले तर तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचेल. या यादीत सचिन तेंडुलकर १८४२६ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल
भावा तुझं काय मध्येच! विराट आणि बाबरच्या विषयात आफ्रिदीची ढवळाढवळ, म्हणाला…
माजी दिग्गजाने हेरली विराटमधील कमतरता! म्हणाला, ‘शैलीमध्ये काहीच कमी नाही, पण…’