एशिया कपमध्ये जिंकणार टीम इंडिया! ‘हे’ योगायोग दर्शवत आहेत निकाल
एशिया कप (Asia Cup) २०२२च्या हंगामाला आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत. युनायटेड अरब अमिराती येथे या स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना २७ ऑगस्टला यजमान संघ श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध (INDvsPAK) खेळणार आहे. या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत भारताची नजर विजेतेपदाची हॅट्ट्रीक करण्यावर असणार आहे. भारत २०१६ आणि २०१८चा एशिया चॅम्पियन राहिला आहे. भारताला सलग तिसऱ्यांदा एशिया कप मिळण्याची अपेक्षा आहे, कारण पुढील दोन्ही योगायोग भारताच्या जिंकण्याच्या आशा पक्क्या करणाऱ्या आहेत.
एशिया कप सर्वप्रथम श्रीलंकेत खेळला जाणार होता. मात्र आर्थिक संकटामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डने वेळेतच निर्णय बदलला. यामुळे ही स्पर्धा युएईमध्ये घेण्याचे ठरले. तर मागील एशिया कप अर्थातच २०१८चा हंगाम युएईमध्येच खेळला गेला आहे. तेव्हा भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा ३ विकेट्सने पराभव करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सातव्यांदा एशिया कपचे विजेतेपद पटकावले होते.
युएईमध्ये एशिया कप भारतासाठी ठरतयं लकी
एशिया कपचे मागील १४ पैकी तीन हंगाम यूएईमध्येच खेळले गेले आहेत. पहिला-वहिला एशिया कप १९८४मध्ये युएईमध्ये खेळवला गेला. त्यावेळी भारताने सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना श्रीलंकेचा पराभव केला होता. त्याकाळी त्या स्पर्धेला रोथमन एशिया कप म्हणत. तसेच भारताने १९९५ आणि २०१८मध्ये एशिया कप जिंकला होता. या दोन्ही स्पर्धा युएईतच खेळवल्या गेल्या.
गटविभागणीही सारखीच
एशिया कप २०१८च्या हंगामात भारत अ गटात होता. त्याचबरोबर यामध्ये पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांचाही समावेश होता. आताच्या हंगामातही हे तिन्ही संघ एकाच गटात आहे. हा पण एक योगायोग झाला आहे. तसेच ब गटात श्रीलंका, अफगानिस्तान आणि बांगलादेश होती. हॉंगकॉंगने क्वालिफायरच्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवत आपले स्थान पक्के केले.
२०१८च्या एशिया कपमध्ये भारताची कामगिरी
साखळी फेरीत भारताने पाकिस्तान आणि हॉंगकॉंग यांच्यावर विजय मिळत सुपर ४मध्ये जागा निश्चित केली होती. त्या फेरीत भारताने पाकिस्तानचा ९ विकेट्स आणि बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला होता. तर अफगानिस्तान विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. यामुळे भारत सुपर ४चे तीन सामने जिंकत अंतिम फेरीत पोहोचला.
महत्वाच्या बातम्या-