क्रिकेटटॉप बातम्या

नशीब उजळले..! ‘हा’ खेळाडू होणार आयपीयल विजेत्या संघाचा कर्णधार;

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसनला दुखापत झाली. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे.  संजू सॅमसनला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे 5-6 आठवडे लागतील. तथापी असे मानले जाते की संजू सॅमसन आयपीएलच्या पहिल्या काही सामने खेळणार नाही. आता प्रश्न असा आहे की जर संजू सॅमसन खेळला नाही तर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व कोण करेल? याचे दावेदार कोण आहेत? खरंतर, संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत, कर्णधारपदासाठी अनेक दावेदारांची नावे समोर येत आहेत, परंतु आपण त्या नावांवर नजर टाकू जे दावेदारांंच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत, रियान पराग राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करू शकतो. खरंतर या खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये आसामचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान, रियान परागने तो कर्णधार बनण्यास सक्षम आहे हे सिद्ध केले. एक चांगला कर्णधार बनण्यासाठी त्याच्यात सर्व गुण आहेत. तसेच, राजस्थान रॉयल्ससोबत रियान परागने गेल्या हंगामात खूप चांगली कामगिरी केली. या काळात तो एक चांगला क्रिकेटपटू म्हणून नावारूपास आला. यावरून, असे मानले जाते की संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराग राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सांभाळू शकतो.

रियान पराग व्यतिरिक्त, संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदासाठी वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर हा एक प्रबळ दावेदार आहे. खरंतर, हा कॅरिबियन फलंदाज कर्णधार म्हणून खेळला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शिमरॉन हेटमायरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने अंडर 19 क्रिकेट विश्वचषक जिंकला. याशिवाय, शिमरॉन हेटमायरने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये गयाना अमेझॉनचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे, कर्णधारपद शिमरॉन हेटमायरसाठी नवीन गोष्ट राहणार नाही.

हेही वाचा :

‘हा’ स्टार खेळाडू चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात पाहिजे, पाहा काय म्हणाला रविचंद्रन अश्विन
भारतीय संघ कसा जिंकणार चॅम्पियन्स ट्राॅफी? माजी क्रिकेटपटूने सांगितले समीकरण
IPL 2025; विराट कोहली RCBचे नेतृत्व करणार का? फ्रँचायझीने दिले मोठे संकेत

Related Articles