सूर्यकुमारने वाढवले बाबर आझमचे टेंशन! आशिया चषकात करू शकतो मोठी कामगिरी

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने त्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वतःचे वेगळे स्थान बनवले आहे. सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी जास्त उशीर लागला. मात्र, जेव्हा त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाहीये. आगामी आशिया चषकात सूर्यकुमारकडे एक मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. 

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आता भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू बनला आहे. त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याचे संघातील महत्व त्याची आकडेवारी पाहून समजू शकते. भारतासाठी फक्त २३ टी-२० सामने खेळणाऱ्या सूर्यकुमारने आयसीसीच्या क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचा स्ट्राईक रेट टी-२० खेळणाऱ्या इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने १७५.४५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. यूएईत खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकात सूर्यकुमार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला मोठा झटका देऊ शकतो.

बाबर आझम सध्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत (ICC T20 Ranking) दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील सूर्यकुमार आशिया चषकात चमकादार कामगिरी करू शकला, तर तो बाबरला पछाडू शकतो. बाबर आझम सध्या ८१८ रेटिंगसह टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर सूर्यकुमार ८०५ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरला पछाडण्यासाठी सूर्यकुमारला अजून १३ रेटिंग गुणांची आवश्यकता आहे, जे तो आशिया चषकात मिळवू शकतो. असे झाते तर तो पहिल्या क्रमांकावर विराजमान होईल.

मागच्याच महिन्यात सूर्यकुमारने एक मोठी कामगिरी केली होती. तो केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुड्डा आणि रोहित शर्मा या चौघांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये शतक करणारा पाचवा खेळाडू बनला होता. इंग्लंडविरुद्ध नॉटिंघममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती. त्याच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार केला, तर खेळलेल्या एकूण २३ टी-२० सामन्यांमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने ६७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक, तर पाच अर्धशतक ठोकले आहेत. दरम्यान, भारताला आशिया चषकातील पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत प्रणव घोळकर, पृथा वर्टीकर यांना दुहेरी मुकुट
VIDEO | आता सुट्टी नाही! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी पंत सज्ज, सराव सत्रात केली वादळी खेळी
आयसीसीच्या ‘१००% सुपरस्टार’ यादीत स्म्रिती मंधानाचा समावेश, इतर चौघींची नावेही घ्या जाणून

Related Articles