भारतात सध्या सर्वत्र इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचे वारे पसरले आहे. ९ एप्रिल पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे. त्यानंतर भारतातच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकन संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
दक्षिण आफ्रिकन संघाचा कसोटी कर्णधार डीन एल्गार, मर्यादित षटकांचा कर्णधार टेंबा बावुमा आणि महिला संघाची कर्णधार डेन व्हॅन निर्क यांनी एक निवेदन जारी केले की, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) सरकारमधील हस्तक्षेप वाढत आहे. या कारणास्तव, वर्षाच्या शेवटी होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आयसीसी दक्षिण आफ्रिकन संघाला प्रवेश देण्यास बंदी घालू शकते.
प्रशासनावरील हे संकट १८ महिन्यांपासून सुरू आहे. आता सध्याची परिस्थिती खूप पुढे गेली आहे. आता क्रीडा मंत्रालयाने अधिकृतपणे हस्तक्षेप करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या संकटावर तोडगा काढण्यासाठी क्रीडा मंत्र्यांनी खूप संयम ठेवले आहे. तसेच स्वाक्षरी केलेल्या अहवालात लिहिले आहे की, “सरकारने क्रीडा क्षेत्रात हस्तक्षेप केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. ते किती टोकाचे असतील याची आम्हाला कल्पना नाहीये. तसेच आयसीसी सीएसएवर निलंबनाची कारवाई करू शकते.”
जर आयसीसीने सीएसएला निलंबित केले तर, दक्षिण आफ्रिकन संघाला भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही. तसेच या संघाला बंदीच्या कालावधीत कुठलीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळता येणार नाही. जर असे झाले तर ही क्रिकेट विश्वासाठी निराशाजनक बाब असेल.
काही काळापूर्वी आयसीसीने आशा प्रकारे झिम्बाब्वे संघावर कारवाई केली होती. पण आता झिम्बाब्वेवरील बंदी उठली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोईन अलीची विकेट सुनील नारायणसाठी ठरली विक्रमी; हरभजनला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम
डायव्हिंग डेव्हिड! वॉर्नरने पकडलेला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ
अभिनंदन फाफ! डू प्लेसिसने टी२० कारकिर्दीत केला ‘हा’ मैलाचा दगड पार