भारतात क्रिकेट आणि बॉलिवुडसाठी लोकांमध्ये प्रचंड आकर्शन आहे. हे दोन्ही क्षेत्र तसे पाहिता आधिपासून एकमेकांशी संबंधित राहिले आहेत. पण 2008 साली इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यानंतर या दोन्ही क्षेत्रांमधील अंतर अधिकच कमी झाले. बॉलिवुडचा सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याने दिल्ली फ्रँचायझीला आर्थिक डबफाईत जाण्यापासून वाचवले होते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे माजी महाव्यवस्थापन यांनी आपल्या नवीन पुस्तकात याबाबत खुलासा केला. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 साली खेळला गेला होता आणि अक्षक कुमार (Akshay Kumar) दिल्ली डेअरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाचा चेहरा (ब्रँड एम्बेसिडर) बनला होता. फ्रँचायझीने तीन आयपीएल हंगामांसाठी अक्षय कुमारसोबत करार केला होत्या. अमृत माथूर (Amrit Mathur) त्यावेळी दिल्ली डेअरडेविल्सचे सीईओ होते. अक्षय त्यावेळी अभिनय श्रेत्रात आपल्या सर्वोच्च शिखरावर होता, असे आपण म्हणू शकतो.
मात्र, दिल्ली फ्रँचायझीला अक्षयच्या चेहऱ्याचा पाहिजे तितका फायदा मिळाला नाही. पहिल्या हंगामात फ्रँचायझीने आपला ब्रँड तयार करण्यासाठीची सुवर्ण संधी गमावली होती. याच कारणास्तव फ्रँचायझीला आर्थिक फटका देखील बसला होता. अभिनेत्यासोबत केलेला तीन वर्षांचा करार अचानक मोडणे शक्य नव्हते. पण माथूर स्वतः अक्षयशी बोलल्यानंतर यावर तोडगा निघाला. अक्षयने मोठ्या मनाने करार संपवण्यासाठी परवानगी दिली. आपल्या “पिचसाईड: माय लाईफ इन इंडियन क्रिकेट” या पुस्तकात माथूर यांनी याबाबत लिहिले आहे.
माथूर यांनी पुस्तकात उल्लेख खेल्याप्रमाणे, “त्याचा शुटनंतर आम्ही वॅनिटी व्हॅनमध्ये गेलो. मी घाबरत-घाबरत त्याठिकाणी येण्याचे कारण सांगितले. फ्रँचायझी आर्थिक संकटात असल्याची माहिती मी त्याला दिली. यावर तो म्हणाला, काहीच हरकत नाही. आपण करार संपवू. मला वाटले मी नीट ऐकले नाही. मला संभ्रमात पाहून अक्षय कुमार पुन्हा म्हणला, करार संपवू. करारातील अटिंविषयी मी त्याला लक्पना दिली. त्यावर अक्षय मला विश्वास देत, मी वकिलांशी बोलतो म्हणाला.” (Akshay Kumar saved Delhi franchise in trouble! Suffered loss of crores)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातून सॅमसनचा पत्ता टक? ‘या’ तारखेळा संघ घोषित होण्याची शक्यता
द्रविड आणि जय शहांमध्ये दोन तास चर्चा! बीसीसीआयचा आशिया कप आणि वर्ल्डकप मोड ऑन