मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने ऑस्ट्रेलिया व श्रीलंका विरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. मात्र भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर भारताचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने निवड समितीच्या संघ निवडीच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवचे नाव न पाहिल्यामुळे हरभजन सिंग अस्वस्थ झाला आणि थेट निवड समितीवर प्रश्न उपस्थित केला.
भारत दौर्यावर येत असलेले दोन मोठे संघ ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरूद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवकडे खेर दुर्लक्ष का करण्यात आले, असे हरभजन सिंगने निवडकर्त्यांना विचारले.
हरभजनने ट्विटरवरुन विचारले, ‘सूर्यकुमारने काय चूक केली आहे याबद्दल मला आश्चर्य वाटते? अन्य खेळाडूंप्रमाणे त्यानेही धावा केल्या आहेत. पण त्यांची भारतीय संघात भारत- अ, भारत-ब संघात निवड होते. मात्र प्रत्येकासाठी वेगळा नियम का?’
I keep wondering what’s wrong @surya_14kumar hv done ? Apart from scoring runs like others who keep getting picked for Team india india/A india /B why different rules for different players ???
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 24, 2019
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 73 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 13 शतकं आणि 24 अर्धशतकाच्या मदतीने 4920 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 43.53 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
टी20 मध्ये त्याने 149 सामन्यात 31.37 च्या सरासरीने 3012 धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 85 सामने खेळले आहेत आणि 7 अर्धशतकांसह 1548 धावा केल्या आहेत.
श्रीलंका विरुद्ध टी20 सामन्यासाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि संजू सॅमसन.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यासाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, के एल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह.
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाचा👉https://t.co/pbQ7niejv3👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayCook @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाचा👉https://t.co/pbQ7niejv3👈#म #मराठी #Cricket #HappyBirthdayCook @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 25, 2019