सध्या भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. दरम्यान भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) ‘आयसीसी मेन्स टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
2024 मध्ये भारताच्या टी20 विश्वचषक विजयात अर्शदीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 25 वर्षीय अर्शदीपने 2024 मध्ये 18 सामन्यात धारदार गोलंदाजी करत 36 विकेट्स आपल्या नवावर केल्या होत्या. त्याने आयसीसीकडून हा पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत असलेल्या बाबर आझम (Babar Azam), ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि सिकंदर रझा (Sikandar Raza) यांना मागे टाकत बाजी मारली.
तसेच, 2024 मध्ये तो सर्वाधिक टी20 विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर होता. विशेषतः अर्शदीप सिंगने 2024च्या टी20 विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते.
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हा भारत-इंग्लंड संघात खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेचा भाग आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने इतिहास रचला. तो टी20 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) मागे टाकले. चहलच्या नावावर 96 टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. तर अर्शदीपने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत.
From rising talent to match-winner, Arshdeep Singh excelled in 2024 to win the ICC Men’s T20I Cricketer of the Year award 🌟 pic.twitter.com/iIlckFRBxa
— ICC (@ICC) January 25, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी गिल फॉर्ममध्ये परतला, झळकावले शानदार शतक, टीकाकारांची बोलती बंद!
IND vs ENG; भारतानं जिंकला टाॅस, ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा वगळले!
आयसीसीकडून वर्षातील सर्वोत्तम टी20 संघाची घोषणा, हिटमॅनची कर्णधारपदी वर्णी..!