जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथ यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. पहिल्या दिवशी हे दोघेही अनुक्रमे 146* आणि 95* धावांसह खेळपट्टीवर कायम होते. दुसऱ्या दिवशी स्मिथने आपले 31वे कसोटी शतक पूर्ण केले. हेडकडेही मोठा विक्रम नावावर करण्याची संधी होती. मात्र, अवघी एक धाव कमी पडल्यामुळे तो असे करू शकला नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानातवर आहे. याठिकाणी हे दोन्ही संघ पाहुणे आहेत. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 3 बाद 327 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी शतक केलेला ट्रेविस हेड () दुसऱ्या दिवसी मोहम्मद सिराजची शिकार बनला. दिवसातील सातव्या षटकात हेड 163 धावा करून यष्टीरक्षकाच्या हातात झेलबाद झाला. हेडकडे या सामन्यात 111 वर्ष जुना विक्रम मोडण्याची संधी होती.
ट्रेविस हेड ऑस्ट्रेलियन संघासाठी न्यूट्रल वेन्यूवर सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरू शकत होता. हा विक्रम सध्या वॉरेन बार्डस्ले यांच्या नावावर आहे. त्यांना 1912 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना लॉर्ड्स स्टेडियमवऱ खेळला होता, ज्यात 164 धावांची खेळी केलेली. हेडने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात अजून एक धाव केली असती, तर तो बार्डस्ले यांचा विक्रम मोडून आपल्या नावावर करू शकत होता. हेड आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचे नाव आहे. (A chance to break the 111-year-old record was missed by Travis Head)
न्यूट्रल वेन्यूवर ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी धावसंख्या करणारे फलंदाज
164 – वॉरेन बर्ड्स्ले विरुद्ध दक्षिण आफ्रिका, लॉर्ड्स, 1912
163 – ट्रेविस हेड विरुद्ध भारत, द ओव्हल, 2023
150 – रिकी पाँटिंग विरुद्ध पाकिस्तान, शारजाह, 2002
141 – रिकी पाँटिंग विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, 2002
141 – उस्मान ख्वाजा विरुद्ध पाकिस्तान, दुबई, 2018
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या ‘या’ निर्णयावर संतापले रवी शास्त्री; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘बरोबर बोललात गुरुजी’
WTC Final: स्टीव स्मिथचा जलवा कायम; एक नाही दोन नाही तर तब्बल एवढे रेकॉर्ड काढले मोडीत