नुकताच 19 वर्षांखालील वनडे विश्वचषक खेळला गेला. अंतिम सामन्यात रविवारी (11 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला 79 धावांनी पराभव मिळाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी विभागात अप्रतिम प्रदर्शन केले आणि भारतासारख्या बलाढ्य संघाला मात दिली. हरजस सिंग याने ऑस्ट्रेलियासाठी 64 चेंडूत 55 धावांची सर्वोत्तम खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा हरजस सिंग मुळचा भारतीय असून सथ्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
यावर्षी खेळला गेलेल्या 19 वर्षांखालील वनडे विश्वचषक जानेवारी महिन्याच्या 19 तारखेला सुरू झाला. मालिकेतील एकाही सामन्यात हरजस सिंग (Harjas Singh) अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. पण संघाला गरज असताना अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळी केली. 59 चेंडूत त्याने अर्धशतक पर्ण केले. अंतिम सामन्यात अर्धशतक करणारा हरजस दोन्ही संघांमधून एकटा खेळाडू आहे. या सामन्यात 55 धावांची महत्वपूर्ण खेळी केल्यानंतर हरजस चर्चेत आला. पण त्याआधीच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली होती.
हरजस सिंग ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर उस्मान ख्वाजा याला आपली प्रेरणा मानत आला आहे. 2005 मध्ये त्याचा सिडनी याठिकाणी जन्म झाला. त्याचे वडील चंदीगडचे राहणारे आहेत. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी हरजसने रेवेस्बी वर्कर्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. हरजतचे वडील इंद्रजीत सिंग पंजाबचे राज्यस्थरीय बॅक्सर होते. तसेच त्याची आई अविंदर कौर लांब उडी खेळातील राजस्तरीय खेळाडू होती.
19 वर्षांखालील विश्वचषक सुरू होण्याआधी हरजतने खुलासा केला होता की, त्याचे कुटुंब अजूनही भारतात आहे. त्याने 2015 मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू म्हणाला होता की, “माझे कुटुंब अजूनही चंदीगड आणि अमृतसरमद्ये आहे. सेक्टर 44-डी मध्ये आमचे एक घर आहे. शेवटच्या वेळी 2015 मध्ये मी त्याठिकाणी गेले होते. त्यानंतर मला क्रिकेटचे वेड लागले आणि पुन्हा कधी जाण्याची संधीच मिळाली नाही. माझे चुलतेही तिथेच राहतात.”
(Harjas Singh’s family still living in India? The player himself said)
महत्वाच्या बातम्या –
केन विलियम्सनवर कोसळला दुःखाचा डोंगर! ‘फॅमिली मेंबर’ काळाच्या पडद्याआड
U19 World Cup Final : भारताचे तीन महिन्यांत दोनदा विश्वचषकाचे स्वप्न भंगले; कोहली-रोहितनंतर उदय-सचिनलाही अपयश…