पुणे (9 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये पाचव्या दिवशी शेवटची लढत बीड जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा यांच्यात लढत झाली. बीड जिल्हा चौथा विजय मिळवण्यासाठी आज मैदानात उतरला होता. तर जालना संघ अजून आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिकक्षेत होता. बीड संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यात आघाडी मिळवली.
बीडच्या राहुल टेके ने मध्यंतरापुर्वी सुपर टेन सह या स्पर्धेत 50 गुणांचा पल्ला पार केला. तर शशिकांत दास ने 4 यशस्वी पकडी करत संघाची आघाडी वाढवली. मध्यंतरापुर्वी बीड संघाने दोन वेळा जालना संघाला ऑल आऊट करत 27-08 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. मध्यंतरा नंतर पुन्हा एकदा ऑल आऊट करत बीड संघाने आपला विजय जवळपास निश्चित केला होता.
बीड संघाने 50-22 असा जालना संघाचा पराभव करत प्रमोशन फेरीतील आपले स्थान पक्के केले. बीड कडून राहुल टेके ने चढाईत 15 गुण मिळवले. तर सौरभ राठोड ने 8 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली. शशिकांत दास ने 5 महत्वपूर्ण पकडी करत हाय फाय पूर्ण केला. जालना कडून युवराज जाधव ने सर्वाधिक 7 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- राहुल टेके, बीड
बेस्ट डिफेंडर- शशिकांत दास, बीड
कबड्डी का कमाल- सौरभ राठोड, बीड
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात अश्विनने केली विराटची बरोबरी! खास यादीत पटकावला दुसरा क्रमांक
रोहित शर्मा लवकरच निवृत्ती घेणार? इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयानंतरचं वक्तव्य चर्चेत