सूर्यकुमार यादव हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो काळानुसार आजच्या घडीला सर्वोत्तम टी20 खेळाडू बनला आहे. क्रिकेटविश्वातील अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. भारताच्या या स्फोटक फलंदाजाने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याच्या फलंदाजीचे अनेक चाहते झाले आहेत. त्याच्या या प्रभावशाली फलंदाजीचे कौतुक करताना दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचे म्हटले की, भारताच्या या खेळाडूचा सामना करण्यासाठी गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. यातील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 33 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 3 षटकार खेचत नाबाद 50 धावा केल्या. ज्यामुळे भारताने तो सामना 8 विकेट्सने जिंकला. त्याच्या या अप्रतिम खेळीबाबत दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू वेन पार्नेल (Wayne Parnell) याने सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय टी20चा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे.
दुसरा सामना रविवारी (2 ऑक्टोबर) गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी वेन पार्नेल म्हणाला, “मागील दोन महिन्यांपासून मी जो खेळ पाहिला, त्यानुसार सूर्यकुमार हा आज जगामध्ये टी20चा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.”
“सूर्यकुमार मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शॉट खेळतो. ज्यामुळे गोलंदाजांना बचाव करणे अवघड जात आहे. त्यासाठी गोलंदाजांना मजबूत व्हावे लागेल आणि आपल्या प्रत्येक चेंडूवर आपले लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्याने चांगले शॉट्स खेळले असले तरीही भाग्य त्याच्यासोबत आहे. मागील दोन महिन्यात त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली निश्चितचपणे त्याच्यासारखी फलंदाजी कोणीही केली नाही,” असेही पार्नेलने पुढे म्हटले आहे.
पहिल्या टी20मध्ये दक्षिण आफ्रिकेची वाईट कामगिरी झाली. याबाबत बोलताना पार्नेल म्हणाला, “टी20साठी ती खेळपट्टी चांगली नव्हती. तरीही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आमचे फलंदाजही उत्तम आहे. पहिला सामना गमावला म्हणून घाबरून जाण्याचे काही कारण नाही.”
पहिली टी20 जिंकत भारत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा सामना 4 ऑक्टोबरला इंदौर येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कर्णधाराच्या डोळ्याला गंभीर दुखापत, कारण अद्याप अस्पष्टच
फुटबॉल वर्ल्डकपच्या बक्षिस रकमेपुढे टी20 वर्ल्डकप रक्कम म्हणजे चिल्लर! पाहा डोळे फिरवणारे आकडे
महिला आशिया चषकात ‘हरमन ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! श्रीलंकेला केले चारीमुंड्या चीत