इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामात रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी सहभाग नोंदवला आहे. फाफ डू प्लेसीसच्या नेतृत्वाखाली राॅयल्स चॅलेंजर्स बॅंगलोर (आरसीबी) शानदार कामगिरी करताना दिसत आहे. आता आरसीबीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशचा टॉप-ऑर्डर फलंदाज रजत पाटीदार रविवारी (३ एप्रिल) आयपीएल फ्रँचायझी आरसीबीमध्ये (RCB) लवनीथ सिसोदियाच्या जागी सामील झाला आहे.
आरसीबी (RCB) ने रविवारी (०३ मार्च) अधिकृत निवेदन जारी केले की, आयपीएल (IPL) २०२२ च्या उर्वरित सामन्यांसाठी संघाने दूखापतग्रस्त लवनीथ सिसोदियाच्या जागी रजत पाटीदारला (Rajat Patidar) संघात सामाविष्ट केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटीदारने आतापर्यंत ३१ टी२० सामने खेळले असून ७ अर्धशतकांच्या मदतीने त्याच्या नावावर ८६१ धावा आहेत. या उजव्या हाताच्या फलंदाजाने चार सामन्यात आरसीबी फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व केले आहे. पाटीदारला आरसीबीने २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे.
🚨 ANNOUNCEMENT 🚨
We’re glad to welcome Rajat Patidar back into the RCB camp for the remainder of #IPL2022. He replaces the injured Luvnith Sisodia, who will continue to be in the RCB bio bubble to complete his rehab. #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/2K17iCZIen
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 3, 2022
आरसीबी संघाने या मोसमात आत्तापर्यंत २ सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे तर एका सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला आहे. आरसीबीचा पुढचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध ५ एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आरसीबीला पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने ५ विकेट्सने पराभूत केले आहे, तर दूसऱ्या सामन्यात केकेआरला आरसीबीने ३ विकेट्सने पराभूत केले आहे.
आयपीएल गुणतालिकेत आरसीबी संघ सध्या २ पाॅइंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली याने मागील वर्षी संंघाचे कर्णधारपद सोडले आहे, यावर्षी फ्रॅंचायझीने फाफ डू प्लेसीसला संघाचा कर्णधार बनवले आहे. विराट कोहली सध्या क्रिकेटच्या कोणत्याच फाॅरमॅटमध्ये कर्णधार नाही. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
थाला @३५०! धोनीचा टी२०त ‘भीमपराक्रम’, मैदानावर पाऊल ठेवताच शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
चहलच्या दबावामुळे बटलरने मुंबईविरुद्ध ठोकले शतक, जाणून घ्या जोसने असे म्हणण्यामागचे कारण
CSK vs PBKS | कर्णधार जडेजाने जिंकली नाणेफेक, पंजाबकडून २ खेळाडूंचे पदार्पण; पाहा उभय संघ