भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे काल(15 ऑगस्ट) त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले. पण त्यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच पोलिसांनी सांगितले आहे की त्यांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. याआधी असे वृत्त आले होते की हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
ते कर्जाच्या कारणाने निराश होते. तमिळनाडू प्रीमीयर लीगमध्ये व्हीबी कांची विरान या संघाची मालकीही त्यांच्याकडे होती. तसेच त्यांची वेलोचेरीमध्ये क्रिकेट प्रशिक्षण आकादमी देखील होती.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की ‘त्यांच्यावर कर्ज होते. त्यांनी तमिळनाडू प्रीमीयर लीगमधील व्हीबी कांची विरान संघासाठी 3 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच त्यांनी त्यांचे घरही गहाण ठेवले होते. नुकतीच त्यांना बँकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हापासून ते निराश होते.’
त्यांच्या निधनानंतर बीसीसीआयसह अनेक भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
तमिळनाडूचे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांनी 7 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ते त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जात होते. त्यांनी 1987-88 च्या मोसमात इराणी ट्रॉफीमध्ये 56 चेंडूत शतकी खेळी केली होती. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 81 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 4999 धावा केल्या आहेत.
BCCI regrets to inform that former India opener VB Chandrasekhar is no more. Our heartfelt condolences to his family, friends and his fans.
— BCCI (@BCCI) August 15, 2019
One of the main architects behind CSK’s strong foundation and brand of cricket! V B Chandrasekhar's contribution to TN cricket as a player, mentor and official is immeasurable. He was an intergral part of the Super Kings family and it is truly a personal loss to all of us. 😞 pic.twitter.com/G8AdRdBmTz
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 16, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारतीय क्रिकेटपटूंनी अशा दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, पहा व्हिडिओ
–भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने घातली होती खास जर्सी
–व्हिडिओ: अनेकांनी गेलला दिला निरोप; मात्र गेल म्हणाला, ‘मी अजून निवृत्त झालोच नाही’