भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना मागील काही वर्षांपासून संघाबाहेर आहे. त्याने भारतीय निवडकर्त्यांवर अनुभवी खेळाडूंना दुर्लक्षित करण्याचे गंभीर आरोप केले आहेत.
रैनाने (Suresh Raina) आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना (वनडे) जुलै २०१८मध्ये खेळला होता. यानंतर निवडकर्त्यांनी त्याला सतत दुर्लक्षित केले. तसेच संभाव्य यादीतही त्याच्या नावाचा समावेश केला नाही.
याबद्दल बोलताना रैना म्हणाला की, “भारतीय निवडकर्ते (Selectors) संघातून बाहेर असलेले आणि सतत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत असलेल्या खेळाडूंशी चर्चा करणे गरजेचे समजत नाहीत.”
भारतात कोरोना व्हायरस (Corona Virus) आणि लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. त्यामुळे इतर खेळाडूंप्रमाणे रैनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. अशाच प्रकारे इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान चाहत्याने त्याला पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देत रैनाने निवडकर्त्यांवर निशाना साधला.
“मी भारतीय संघाकडून १४ ते १५ वर्षांपासून खेळत आहे. यादरम्यान सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात मी खेळलो आहे. चूकीचे काही घडत असेल तर विराट कोहली (Virat Kohli), गांगुली आणि धोनी मला नेहमी सांगत असतात. परंतु निवडकर्त्यांकडून कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. आमची चूक कुठे होत आहे आणि आम्ही काय केले पाहिजे, हे आम्हाला सांगितले नाही,” असे निवडकर्त्यांबद्दल बोलताना रैना म्हणाला.
रैना पुढे म्हणाला की, “मला वाटते की, निवडकर्त्यांनी अनुभवी खेळाडूंची जबाबदारी घ्यायला हवी होती. आम्हाला सांगण्यात आले होते की, तुम्ही तुमची यो-यो चाचणी पूर्ण करा. त्यावेळी मी आणि युवराज सिंगने (Yuvraj Singh) ही चाचणीदेखील चांगल्याप्रकारे पूर्ण केली होती.”
“परंतु असे असूनही निवडकर्त्यांनी आमच्याशी चर्चा केली नव्हती. जर निवडकर्त्यांनी आमच्याशी चर्चा केली असती, तर आम्ही कुठे चुकतो आणि नेट्समध्ये कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे हे समजले असते,” असेही रैना म्हणाला.
रैनाने आतापर्यंत १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. तर वनडेत ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत.
याबरोबरच त्याने कसोटी क्रिकेटच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. टी२०त त्याने २९.१८ च्या सरासरीने १६०५ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-काय सांगता! कसोटीमध्ये चौथ्या डावात या ५ खेळाडूंनी केली आहे द्विशतके
-कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज
-मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक धावा करणारे ५ कसोटीपटू