कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बुधवारी(२ डिसेंबर) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना झाला. या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजनने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो भारताकडून वनडे पदार्पण करणारा २३२ वा क्रिकेटपटू ठरला.
याबरोबरच तो गेल्या ४ वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना वनडे पदार्पण करणारा भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी गेल्या ४ वर्षात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि विजय शंकर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये वनडे पदार्पण केले होते.
बुमराहने २३ जानेवारी २०१६ ला सिडनी येथे वनडे पदार्पण केले होते. तर सिराजने ऍडलेड येथे १५ जानेवारी २०१९ ला वनडे पदार्पण केले होते. तसेच विजय शंकरनेही सन २०१९ मध्येच १८ जानेवारीला मेलबर्न येथे वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर आता नटाराजनचेही ऑस्ट्रेलियातच वनडे पदार्पण झाले आहे. विशेष म्हणजे हे चारही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज आहेत. त्यातही या चौघांनी ऑस्ट्रेलियातील चार वेगवेगळ्या मैदानात वनडे पदार्पण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन दुर्दैवी फलंदाज जे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत विराटचा ‘भीमपराक्रम’, सचिनच्या धावांचा ‘तो’ विक्रमही मोडला