पुणे, 30 डिसेंबर, 2023: अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेटअजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीसीएमसी येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत तरुणकुमार राय(25 व 6-11) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इन्फोसिस पुणे संघाने आयडीयाज अ सास कंपनी संघाचा 46 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
दुसऱ्या सामन्यात सुनील बाबर(3-36)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संघाने व्हेरिटास पुणे संघावर 9धावांनी विजय मिळवला. याआधी स्पर्धेचे उदघाटन अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष विंग कमांडर उदय जोगळेकर, उपाध्यक्ष विजय जोगळेकर, आयडीयाज-अ-सास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक केएस प्रशांत, वित्तीय विभागाच्या प्रमुख मल्लिका जेम्स, आयडीयाज इंडिया ऑपरेशन्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राजीव नाशिककर, आयडीयाज-अ-सास कंपनीचे माजी संचालक विद्याकांत काला यांच्या हस्ते करण्यात आले. (18th Ankur Joglekar Memorial Inter IT Cup Cricket Championship: Infosys, TCS Teams Open)
संक्षिप्त धावफलक: साखळी फेरी:
इन्फोसिस पुणेः 20 षटकात 7बाद 149धावा(संदिप संघाय 71(42,10×4,2×6)), तरुणकुमार राय 25, सागर बिरदवडे 17, निखिल रोकडे 13, अरुण सिंग 3-21, रौनक टंक 2-17, प्रवीण निमोडिया 2-17 ) वि.वि.आयडीयाज अ सास कंपनी: 19.2 षटकात सर्वबाद 103धावा(प्रसाद कुंटे 47(45,5×4,1×6), प्रवीण निमोडिया 12, तरुणकुमार राय 6-11, सूरज गुप्ता 3-19, हर्षद तिडके 1-14); सामनावीर-तरुणकुमार राय; इन्फोसिस पुणे संघ 46 धावांनी विजयी;
टीसीएस: 20 षटकात 6बाद 175धावा(प्रवीण इंगळे 44(33,3×4,3×6), उदय गलांडे नाबाद 31(19,5×4,1×6), शुभम कबाडी 26, आदित्य लहाने 18, पूरब गजिंकर 18, अमृत आलोक 1-23, सुमित दिघे 1-24, आशुतोष देशमुख 1-36) वि.वि.व्हेरिटास पुणे: 20 षटकात 6बाद 166धावा(सूरज झा 39(43,5×4), सुमित दिघे 37(33,1×4,2×6), स्वानंद भागवत 17, अमृत आलोक 13, सुशांत मुळे 10, सुनील बाबर 3-36, प्रवीण राऊत 1-23, आकाश प्रिन्स 1-28;सामनावीर-सुनील बाबर; टीसीएस 9 धावांनी विजयी;
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियावर भारी पडली दीप्ती, आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला विक्रम केला नावावर
श्रीलंकेला मिळाले दोन नवे कर्णधार, झिम्बाब्वेविरूद्द वनडे आणि टी20 मालिकेत करणार नेतृत्व