दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निराशाजनक कामगिरी नंतर भारतीय संघातील खेळाडूंवर जोरदार टीका होऊ लागली आहे. कर्णधार केएल राहुलच्या (Kl Rahul) नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत, तर या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरलेल्या आर अश्विन (R ashwin) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar kumar) यांना संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने आर अश्विन बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने मंगळवारी (२५ जानेवारी ) स्पोर्ट्स टूडे सोबत बोलताना म्हटले की, ” मला वाटते की, ईशांत शर्मा आणि आर अश्विन यांनी वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आर अश्विनबद्दल माझ्या मनात आदर आहे, तो एक चॅम्पियन गोलंदाज आहे. परंतु, मला आता असे वाटते की, वनडे क्रिकेटसाठी पर्यायी गोलंदाज निवडण्याची वेळ आली आहे. असं होऊ शकतं की असा एक गोलंदाज असेल तो चेंडू आत आणि बाहेर टाकू शकेल.”
तसेच त्याने याबाबत सल्ला देत म्हटले की, “कुलदीप यादव सारखा खेळाडू चांगला पर्याय असू शकतो. आपण पुन्हा कुलचा जोडीकडे का वळत नाहीये. त्यांनी भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यांच्या घेऊन घेणे नक्कीच फायदेशीर ठरेल. आर अश्विन आणि युझवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेत एकत्र खेळले. त्यांनी दोघांनी फलंदाजांना बाद करण्याची खूप कमी संधी निर्माण केली. ते एक स्लीप लाऊन फलंदाजावर आक्रमण करू शकत होते.”
“खेळपट्टी कशी ही असो, तुम्ही विश्वचषक स्पर्धेत कुठल्याही संघाविरुद्ध आक्रमक असाल तर मधल्या षटकात तुम्हाला गडी बाद करून द्यावे लागतील. हे सर्व यावर अवलंबून असेल की, तुम्ही एक गोलंदाज म्हणून फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण करता की नाही. भारतीय संघाला कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल सारख्या गोलंदाजांची गरज आहे. तुम्ही वरून चकवर्तीचा एक एक्स फॅक्टर म्हणूनही वापर करू शकता.” असे हरभजन सिंग म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित करणार नेतृत्त्व; कोण होणार संघात इन आणि कोण होणार आऊट? वाचा सविस्तर
हे नक्की पाहा: