फेब्रुवारी महिन्यात श्रीलंका संघ (seri lanka cricket team) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाला पाच सामन्यांची टी२० (aus vs sl t20 series) मालिका खेळायची आहे. आता या आगामी दौऱ्यापूर्वी श्रीलंका संघाच्या चाहत्यांसाठी एक खूपच आनंदाजी बातमी मिळाली आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) या मालिकेच्या निमित्ताने श्रीलंका संघात पुनरागमन करणार आहे, पण एका नवीन भूमिकेत. यावेळी मलिंगा प्रशिक्षकांच्या भूमिकेत संघात सामील होईल आणि ऑस्ट्रेलिया दौराही करेल.
श्रीलंका संघात सध्या अनेक गुणवंत वेगवान गोलंदाज आहेत, पण त्यांना मिळणारे मार्गदर्शन कुठेतरी कमी पडल्यामुळे ते आतापर्यंत अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत, असेच दिसते. आता मलिंगा श्रीलंका संघाचा स्पेशलिस्ट गोलंदाजी प्रशिक्षक बनणार आहे. क्रिकेट श्रीलंकाने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करून माहिती दिली की, मलिंगाची पुढच्या काही काळासाठी संघाचा स्पेशलिस्ट गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून संदर्भात माहिती दिली. त्यामध्ये लिहिले की, “मलिंगाला थोड्या काळासाठी स्पेशलिस्ट प्रशिक्षकाच्या रूपात नियुक्त केले गेले आहे आणि तो श्रीलंकन गोलंदाजांना मदत करण्याव्यतिरिक्त रणनीती तयार करण्यासाठीही मदत करेल.” बोर्डला पूर्ण विश्वास आहे की, मलिंगाचा अनुभव संघातील सध्याच्या वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. अशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत त्याचा अनुभव नक्कीच कामी येण्याची शक्यता आहे.
मलिंगा श्रीलंका संघाचा एक असा गोलंदाज होता, जो समोर कितीही मोठा दिग्गज फलंदाज असला, तरी त्याचा त्रिफळा उडवण्याची धमक ठेवायचा. संघासोबत पुन्हा सामील झाल्यानंतर मलिंगा म्हणाला की, “श्रीलंकन संघात अनेक गुणवंत गोलंदाज आहेत आणि मी माझा अनुभव आणि विचार त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे.” दरम्यान मलिंगाने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत एकूण १०० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये ही कामगिरी फक्त चार गोलंदाजांना करता आली आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेला श्रीलंकन संघ –
दसुन शनाका, चरिथ असालंका, अविष्का फर्नान्डो, पथुम निसांका, धनुष्का गुणातिलका, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, चमिका करुणारत्ने, जनिथ लियानागे, कामिल मिशारा, रमेश मेंडिस, वानेंदु हसारंगा, लाहिरु कुमारा, नुआन तुषारा, दुष्मंता चमीरा, बिनुरा फर्णाण्डो, महेश तीक्षणा, जैफरी वैंडरसे, प्रवीण जयाविक्रमा, शिरान फर्णाण्डो.
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
प्रजासत्ताक दिनी यु मुंबाचा विजयी सलाम! बेंगलोरसाठी पवनची एकाकी झुंज
वनडे क्रमवारी: भारताच्या विराट कोहली, रोहित शर्माला मोठे नुकसान, पाहा कोण कितव्या स्थानावर
व्हिडिओ पाहा –