सध्या क्रिकेटप्रमींच्या चर्चेचा विषय ठरत आहे ती, म्हणजे लिजेंड्स लीग क्रिकेट (legends league cricket). या स्पर्धेत २७ जानेवारीला लीग स्टेजचा शेवटचा सामना पार पडला. यामध्ये इंडिया महाराज आणि वर्ल्ड जायंट्स संघ आमने सामने होते. वल्ड जायंट्सने या सामन्यात इंडिया महाराजवर ५ धावांनी विजय मिळवला. इंडिया महाराजसाठी पठान बंधूंनी तुफान फलंदाजी केली, पण तरीही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. सामन्यादरम्यान असे काही घडले, ज्यामुळे डग आउटमध्ये इरफान पठाण (irfan pathan) भांगडा डान्स करताना दिसला.
इंडिया महाराजचा कर्णधार यूसुफ पठाणने (Yusuf Pathan) कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने २२ चेंडूत ४५ धावा केल्या. तसेच त्याचा भाऊ इरफान पठाणने ताबडतोब अर्धशतकी खेळी केली. इरफानने अवघ्या १८ चेंडूत ५० धावा केल्या, तर एकूण २२ चेंडूत ५६ धावा केल्या.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
दरम्यान यूसुफ पठाणने फलंदाजी करताना एक असा मोठा षटकार मारला, जो पाहून मैदानातील प्रत्येक जण हैराण झाला. इरफान पठाण या प्रसंगी भांगडा करताना दिसला होता.
यूसुफ पठाणचा हा षटकार तब्बल ९५ मीटर लांब गेला, त्यावेळी ब्रेट ली गोलंदाजी करत होता. त्यानंतर त्याचा भाऊ इरफान आनंदात डान्स करू लागला. चाहत्यांकडूनही यूसुफच्या या षटकाराचे कौतुक केले जात आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/SportsHustle3/status/1486751167363227650?s=20&t=QxwUqcr0vqs0w_YmKkdLjw
इंडिया महाराजला या सामन्यात विजयासाठी शेवटच्या षटकात ८ धावांची आवश्यकता होता, पण ब्रेट लीने या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि स्वतःच्या संघाला विजयी मिळवून दिला. लीने टाकलेल्या या शेवटच्या षटकात अवघ्या दोन धावा खर्च केल्या आणि इरफान पठाणची महत्वाची विकेटही घेतली.
दरम्यान, वर्ल्ड जायंट्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंडिया महाराज संघानेही चांगले आव्हान दिले. परंतु शेवटच्या षटकात ब्रेट ली इंडिया महाराजच्या फलंदाजांवर भारी पडला. लीने शेवटच्या षटकात दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि अवघ्या दोन धावा खर्च केल्या. परिणामी वर्ल्ड जायंट्सने सामन्यात पाच धावा राखून विजय मिळवला
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! कोहलीच्या माजी साथीदाराला दिल्ली पोलिसांकडून जबर मारहाण, थोडक्यात वाचला डोळा
विंडीज दौऱ्यापूर्वी १ फेब्रुवारीला भारतीय संघ अहमदाबादमध्ये जमणार एकत्र, ‘असे’ असेल पुढील नियोजन
व्हिडिओ पाहा –