सध्या आयपीएल (IPL) मेगा लिलाव सुरू आहे. या मेगा लिलावात अनेक रेकाॅर्ड मोडले गेले. लिलावाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेटमध्ये 27 कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंतला लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) विक्रमी बोली लावून संघात सामील केले आहे. लिलावात सर्वाधिक चर्चेत असलेला आणखी एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणजे इशान किशनला (Ishan Kishan) सनरायझर्स हैदराबादने (SRH) 11.25 कोटी रूपयांमध्ये संघात सामील केले आहे.
लिलावात इशान किशनचे (Ishan Kishan) नाव आल्यावर जुना संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) बोली लावण्यास सुरुवात केली. नंतर मुंबईने आपले हात मागे घेतले. यानंतर दिल्ली आणि पंजाबमध्ये इशानवरून युद्ध सुरू झाले. नंतर हैदराबादनेही इशानबाबत लिलावात उडी घेतली आणि पंतला आपल्या ताफ्यात सामील केले. पण यावेळी इशानला मागील लिलावाच्या तुलनेत कमी पैसे मिळाले आहेत.
इशान किशनने (Ishan Kishan) 2016 मध्ये गुजरात लायन्सकडून खेळून आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात केली होती. 2018 मध्ये तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. मुंबई इंडियन्ससाठी त्याने आक्रमक फलंदाजी, यष्टिरक्षण तसेच फलंदाजीच्या क्रमवारीत विविध स्थानांवर फलंदाजी करून घवघवीत यश मिळवले.
2020 मध्ये इशान किशनचा सर्वोत्तम हंगाम राहिला होता, जेव्हा त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 516 धावा केल्या होत्या. याआधीच्या मेगा लिलावात इशान किशनला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. इशान किशनच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 105 सामन्यांमध्ये 135.87च्या स्ट्राइक रेटने एकूण 2,644 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
व्यंकटेश अय्यरवर लिलावात लागली 23.75 कोटींची बोली, ‘या’ संघातून खेळताना दिसणार
आनंदाची बातमी! मेगा लिलावादरम्यान जय शाहंच्या घरी पाळणा हलला
IPL Mega Auction; दिग्गज फिरकीपटू खेळणार धोनीच्या संघातून, 9.75 कोटीला केले खरेदी