भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. भारताने बांगलादेशला 3-0 ने धूळ चारली. तिन्ही सामन्यात भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली. पण भारताचा युवा खेळाडू हर्षित राणाला (Harshit Rana) तिसऱ्याही टी20 सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही, यामागचे कारण काय? हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
भारताचा युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) पदार्पण न करण्यामागचे कारण म्हणजे त्याचा आजार. भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून माहिती देताना सांगितले की, हर्षित राणाला व्हायरल संसर्ग झाला आहे. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नाही.
राणाने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण न केल्याने आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) खूश आहे. वास्तविक केकेआर आनंदी असण्यामागचे कारण म्हणजे आयपीएल 2025च्या मेगा लिलावाचे नियम. जर हर्षितने आज भारतासाठी पदार्पण केले असते, तर लिलावाच्या नवीन नियमांनुसार केकेआरला त्याला संघात कायम ठेवण्यासाठी किमान 11 कोटी रुपये खर्च करावे लागले असते.
आता हर्षित राणा (Harshit Rana) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत नसल्यामुळे केकेआर त्याला आयपीएलच्या मेगा लिलावात अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकतो. प्रत्येक संघ रिटेंशन किंवा आरटीएम द्वारे मेगा लिलावात 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवू शकतो. अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवण्यासाठी संघाला 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत राणाने भारतीय संघात पदार्पण न केल्यामुळे केकेआर संघ किमान 7 कोटी रुपये वाचवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्याचे टी20 मध्ये 2500 धावा पूर्ण, कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा
IND vs BAN T20: कोण ठरला सामनावीर आणि कोणाला मिळाली मालिकावीर ट्रॉफी, जाणून घ्या
ind vs ban; दिवाळीपूर्वी टीम इंडियाची आतषबाजी! ऐतिहासिक विजयासह टी20 मालिका खिश्यात