न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मंगळवारी निकाली निघाला. इंग्लंडने शेवटच्या दिवशी ५ विकेट्स राखून सामना नावावर केला. इंग्लंडला विजय मिळवून देण्यासाठी शेवटच्या डावात त्यांचा अनुभवी फलंदाज जॉनी बेयरस्टोने झंजावाती शतक ठोकले. यादरम्यान बेयरस्टोच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद देखील झाली.
न्यूझीलंडचा दुसरा डाव शेवटच्या दिवशी संपला आणि बेयरस्टोच्या वेगवान शतकांच्या जोरावर इंग्लंडने शेवटच्या दिवशी सामना देखील जिंकला. अवघ्या ७७ चेंडूत बेयरस्टोने हे शतक पूर्ण केले. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे.
यापूर्वी इंग्लंडच्या गिलबर्ट जेसफ यांनी १९०२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात वेगवान शतक केले होते. ७६ चेंडूत त्यांनी शतकाला गवसणी घातली होती. तसेच इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोकने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अवघ्या ८५ चेंडूत शतक केले होते. लॉर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेन स्टोकने केलेले हे शतक, त्यावेळी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील इंग्लंडकडून दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले होते. पण आता जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) या बाबतीत त्याला मागे टाकले असून तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बेयरस्टोने जर या सामन्यात अजून एक चेंडू कमी खेळूत शतक पूर्ण केले असते, तर त्याच्या नावावर मोठा विक्रम झाला असता. कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या डावातील सर्वात वेगवान शतक इंग्लंडचे माजी दिग्गज गिल्बर्ट जोसॉफच्या नावावर आहे, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९०२ मध्ये अवघ्या ७६ चेंडूत शतक केले होते. बेयरस्टोने देखील शेवटच्या डावात ७७ चेंडूत ही कामगिरी केली असून, त्याला या यादीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
पाकिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार आणि अष्टपैलू शाहीद आफ्रिदी या यादीत आगोदर दुसऱ्या क्रमांकावर होता, पण बेयर्स्टोने त्याचा विक्रम मोडला. आफ्रिदीने २००५ मध्ये ७८ चेंडूत कसोटी शतक ठोकले होते. यादीत चौथ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे, ज्याने २००३ मध्ये ८४ चेंडूत ही कामगिरी केली आहे. पाचव्या क्रमांकावर जो डार्लिंग आहेत, ज्यांनी १८९८ मध्ये ८५ चेंडूत शतक केले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या डावात सर्वात वेगवान शतक करणारे खेळाडू
७६ चेंडू – गिल्बर्ट जोसॉफ विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१९०२)
७७ चेंडू – जॉनी बेयरस्टो विरुद्ध न्यूझीलंड (२०२२)
७८ चेंडू – शाहीद आफ्रिदी विरुद्ध वेस्ट इंडीज (२००५)
८४ चेंडू – मॅथ्यू हेडन विरुद्ध जिम्बाब्वे (२००३)
८५ चेंडू – जो डार्लिंग विरुद्ध इंग्लंड (१८९८)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
राजस्थानचा ‘रॉयल’ रियान पराग इतका डोक्यात का जातोय? IPLच्या सामन्यात समालोचकांकडूनही खाल्लाय ओरडा
भारताला तडफदार सुरुवात देणाऱ्या ‘ऋतु-इशान’ने रचलाय इतिहास, वाचा काय आहे विक्रम
व्वा! वॉर्नरने झेप घेत एका हाताने टिपला अविस्मरणीय झेल, पाहा व्हिडिओ