जगातील सर्वात मोठा टी२० खेळाडू म्हटला जाणारा वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल हा मागील काही काळापासून फॉर्मशी झगडत होता. मात्र, सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गेलने तुफानी खेळी करत आपण फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले.
स्वत:ला ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणवून घेणाऱ्या गेलने या सामन्यात ३८ चेंडूंत ६७ धावा केल्या. वेस्ट इंडीजने केवळ १४.५ षटकांत १४२ धावांचा पाठलाग करताना ६ गड्यांनी विजय मिळविला. या विजयासह कॅरेबियन संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. गेलने सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली.
तिसर्या टी२० दरम्यान त्याच्या बॅटवर फक्त ‘द बॉस’चा स्टिकर दिसू शकला. त्याविषयी बोलताना गेलने उघड केले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) माझ्या बॅटवर ‘युनिव्हर्स बॉस’ लिहिण्यास नाही म्हणत आहे. क्रिकेट डॉट कॉमने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये गेल म्हणाले की, “मी युनिव्हर्स बॉसचा वापर करावा अशी आयसीसीची इच्छा नाही. म्हणून मी ते लहान केले आणि नुकतेच ‘द बॉस’ लिहिले. आता मी बॉस आहे.”
‘युनिव्हर्स बॉस’ या शब्दाचा कॉपीराइट आयसीसीकडे आहे का? असे विचारले असता गेल म्हणाला, “आयसीसी नाही तर मला त्याचा कॉपीराइट घ्यावा लागेल. कारण, तांत्रिकदृष्ट्या मीच बॉस आहे.”
Chris Gayle's got some fresh stickers after a short conversation with the ICC! 😅 #WIvAUS pic.twitter.com/99nxhrBrGP
— cricket.com.au (@cricketcomau) July 13, 2021
गेलची धमाकेदार खेळी
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गेलने आपले जुने रूप दाखवत केवळ ३८ चेंडूत तुफानी ६७ धावा फटकावल्या. यामध्ये ४ चौकार व ७ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. याच खेळीदरम्यान त्याने टी२० क्रिकेटमध्ये १४००० धावा पूर्ण केल्या. गेलने आंतरराष्ट्रीय टी२० व लीग क्रिकेटमध्ये आतापर्यंत २२ शतके आणि ८७ अर्धशतके झळकावली आहेत.
गेल आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर असून तो वेस्ट इंडिजसाठी फक्त टी२० सामने खेळत आहे. ४१ वर्षीय गेल यावर्षीच्या टी२० विश्वचषकात वेस्ट इंडीजला तिसरे विजेतेपद जिंकून देण्यात महत्वाची भूमिका निभावताना दिसेल. यावर्षी टी२० विश्वचषकाचे आयोजन १७ ऑक्टोबरपासून युएई आणि ओमान येथे केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दादा’ची दादागिरी आता रुपेरी पडद्यावर! २५० कोटींच्या बजेटचा बायोपिकसाठी; पण अभिनेता कोण?
स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई, सामना जिंकणंही अवघड! ‘द हंड्रेड लीग’चे नवे नियम वाचलेत का?
काय सांगता! आयपीएल २०२० फायनलमधील प्रतिस्पर्धी दिसणार एकत्र, ‘या’ संघात नियुक्ती