क्रिकेटमध्ये अनेकदा क्रिकेटपटू आपल्या अनोख्या कृतींनी सर्वांचे लक्ष वेधत असतात. असेच काही दिवसांपूर्वी इंडियन प्रमीयर लीग २०२१ हंगामातील एका सामन्यादरम्यान राजस्थानच्या रियान पराग आणि राहुल तेवतियाने केलेले अनोखे सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले होते.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात २४ एप्रिल रोजी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला होता. या सामन्यादरम्यान राजस्थानचा युवा अष्टपैलू रियान परागने पॅट कमिन्सचा झेल पकडल्यानंतर राहुल तेवतियासोबत मिळून एक अनोखे सेलिब्रेशन केले होते.
झेल पकडल्यानंतर राहुल तेवतिया रियान परागकडे धावत आला. त्याचवेळी, रियानने आपल्या खिशातून मोबाईल काढून तो तेवतियाकडे फेकल्याचे नाटक केले. त्यानंतर, दोघांनी एकत्र येत सेल्फी काढल्यासारखी कृती केली. या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
आता या सेलिब्रेशनमागील एक खुलासा परागने नुकताच केला आहे. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात परागने त्याच्या या सेलिब्रेशनबद्दल भाष्य केले आहे. याबरोबरच त्याने सेलिब्रेशनसाठी आणखीही काही योजना आखल्या होत्या, असेही सांगितले.
https://www.instagram.com/p/CODeXkclg3d/
परागने म्हटले आहे की ‘मी पहिल्यांदा काही वेगळीच योजना आखली होती. मी जान्हवी कपूरप्रमाणे डान्स स्टेप्स करण्याचा विचार केला होता, पण मी सहाव्या षटकात पाणी पीत होतो, त्यानंतर मी पाण्याच्या बॉटलला किक मारली. त्यामुळे मला फिफाची आठवण झाली आणि मला फुटबॉलपटू नेमारही आठवला. कारण तो सुद्ध पत्रकार परिषदेच्यावेळेला कॅमेराबरोबर काहीतरी करताना दिसला होता. तर मग मी विचार केला की सेल्फी सेलिब्रेशन करु, जे छोचे आणि चांगले होईल.’
तसेच राहुल तेवतियाबरोबर सेलिब्रेशन करण्याबद्दल पराग म्हणाला, ‘जेव्हा मी राहुल त्रिपाठीचा पहिला झेल घेतला होता, तेव्हा मी राहुलला सेल्फी घेण्यास सांगितले होते. पण त्यावेळी तो मला म्हणाला, यावेळी काही समजले नाही, पण पुढच्या वेळेला जेव्हा आपण झेल घेऊ, तेव्हा चांगले सेलिब्रेशन करु. त्यानंतर मी दुसरा झेल घेतला, तेव्हा मी माझ्या खिशातील काल्पनिक फोन काढून त्याच्याकडे फेकला आणि त्यानेही यावेळी चांगली सेल्फी घेतली. आमच्या दोघांचा ताळमेळ चांगला आहे.’
याबरोबरच परागने पुढील सामन्यातही असेच वेगवेगळे सेलिब्रेशन करण्याची मनिषा प्रकट केली.
📹 Exclusive: @ParagRiyan reveals the story behind his 🤳 celebration. 😁#HallaBol | #RoyalsFamily | #IPL2021 pic.twitter.com/fapT7dpuVq
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 27, 2021
विविध सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात दोघे
रियान पराग व राहुल तेवतिया आपल्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. २०१९ आयपीएलमध्ये प्रथमच राजस्थानसाठी खेळताना रियानने बळी मिळविल्यानंतर आसाममधील पारंपारिक बिहू नृत्य केले होते. तर, मागील वर्षी राहुल तेवतिया वेगवेगळे सेलिब्रेशन करत होता.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आणि एबी स्वतःचं एक प्रशिक्षक आहेत; जाणून घ्या का असे म्हणाले आरसीबीचे कोच