फलंदाजीचे नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर शनिवारी (७ नोव्हेंबर) महिला आयपीएल २०२०ची रंगतदार लढत झाली. या लढतीत सुपरनोव्हाजने २ धावांनी ट्रेलब्लेझरला नमवत अंतिम सामन्यात धडक मारली. सुपरनोव्हाजच्या या विजयात डावखुरी फलंदाज चमारी अट्टापट्टूने मॅच विनिंग खेळी केली. तिच्या एकाहून एक जबरदस्त शॉट्सने सर्वांचे लक्ष वेधले. सामन्यानंतर तिने आपल्या या पावर हिटिंगमागचे रहस्य उघड केले.
अट्टापट्टूने सांगितले पावर हिटिंमागचे रहस्य
सामना झाल्यानंतरचा अट्टापट्टू, जेमिमाह रोड्रिगेज, संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शकेरा सेलमन या सामन्याची चर्चा करत होत्या. त्यांचा हा व्हिडिओ इंडियन प्रीमियर लीगने ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओत जेमिमाहने अट्टापट्टूला तिच्या जोरदार षटकारांमागचे रहस्य काय? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अट्टपट्टू म्हणाली की, “तीन मसाला डोसा आणि एक मसाला ऑमलेट हे माझ्या जोरदार फटकेबाजी मागचे गुपीत आहे.”
अट्टापट्टूच्या या मजेशीर उत्तराला ऐकून जेमिमाहदेखील अंतिम सामन्यात तीन मसाला डोसा आणि एक मसाला ऑमलेट खाऊन येईल, असे म्हणाली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
On the mic 🎙️: Super four from #Supernovas
Fun on the microphone with Supernovas quartet @selman_shakera, @JemiRodrigues, @ImHarmanpreet & Chamari Athapaththu. This one's a laugh riot.
WATCH 👉https://t.co/7ROkkv4C2I #JioWomensT20Challenge pic.twitter.com/6B6sk1BiG4
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
चमारी अट्टापट्टूची कामगिरी
ट्रेलब्लेझर आणि सुरनोव्हास या सामन्यात अट्टापट्टूने सलामीला फलंदाजीला येत ताबडतोब खेळी केली. तिने ४८ चेंडूत ६७ धावा लगावल्या. यात तिच्या ५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. तिच्या या शानदार फलंदाजीमुळे तिला सामनावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला आयपीएल: ट्रेलब्लेझर-सुपरनोव्हास येणार आमने-सामने; कोण मिळवणार फायनलचं तिकीट?
महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने
‘ही’ प्रसिद्ध कंपनी बनली महिला आयपीएलची टायटल स्पॉन्सर, बीसीसीआयने केली घोषणा
ट्रेंडिंग लेख-
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा