बेसल | टेनिस विश्वातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने गुरुवारी (१४ सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कपनंतर आपण कोणतेही ग्रँडस्लॅम अथवा एटीपी स्पर्धा खेळणार नसल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर पत्र शेअर करत त्याने ही घोषणा केली.
बेसल येथे राॅजर फेडररचा फेडररचा १९८१मध्ये जन्म झाला होता. याच शहरात टेनिसमधील स्विस इनडोअर बेसल ही स्पर्धा होते.
विशेष म्हणजे या स्पर्धेत जेव्हाही फेडरर अंतिम सामना खेळतो तेव्हा तो बॉलबॉय आणि गर्ल यांना पिझ्झा पार्टी देतो. त्याने ही प्रथा जवळजवळ १४ वर्षांपासून कायम ठेवली आहे.
बेसल हे फेडररचे घरचे मैदान आहे. या मैदानावरवर तो वयाच्या ११ व्या वर्षी बॉलबॉय होता. तेव्हा तो सायकलवर या मैदानावर यायचा. त्याचवेळेस या स्पर्धेतील ११९३ सालच्या अंतिम फेरीतील मिचेल स्टिच विरुद्ध स्टीफन एडबर्ग यांच्या सामन्यादरम्यानही तो बॉलबॉय होता.
तेव्हाचे विजेते मिचेल स्टिच यांनी बाॅलबाॅयला विजेतेपदानंतर पिझ्झा पार्टी दिली होती. या बाॅलबाॅयमध्ये ११ वर्षांचा फेडरर स्टिच यांच्याकडून मेडल घेताना दिसत आहे.
यासर्व कारणामुळे फेडरर नेहमी म्हणतो,’ मी तेव्हाही बॉलबॉय होतो आणि मी कायमच बॉलबॉय राहिल.’
https://twitter.com/MangoBwoy/status/924680112640999424?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E924680112640999424&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Froger-federer-hosts-pizza-party-for-ball-boys-and-girls-in-incredible-basel-gesture%2F
आपल्या या शहरातील स्पर्धेत फेडरर जेव्हाही जिंकतो किंवा पराभूत होतो तेव्हा तो सगळ्या बॉलबॉय आणि गर्लला पिझ्झा पार्टी देतो आणि स्वतःसुद्धा या पार्टीत सामील होतो. ही पिझ्झा पार्टी म्हणजे त्या सगळ्या बॉलबॉय आणि गर्लसाठी एक आनंदाची पर्वणी असते. त्याचबरोबर फेडरर या बॉलबॉय आणि गर्ल यांना एक मेडलही देतो.
From Basel ball boy in 1993 to eight-time champion in 2017 ☺️
Dream high, everyone…@rogerfederer #SwissIndoors pic.twitter.com/hdXCkFlEyU
— Tennis TV (@TennisTV) October 29, 2017
From ball boy to an all-time legend @rogerfederer #Rogerfederer 🍕🍕🍕🍕🍕🎾🎾🎾🎾🎾 pic.twitter.com/bvtDmCpWhr
— Sharad Bodage (@SharadBodage) October 30, 2017
https://www.instagram.com/p/uodRg1Av3r/
https://www.instagram.com/p/BpfUQFoAueV/
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
BREAKING: टेनिस सम्राटाचा थांबण्याचा निर्णय; रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा
तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल
न्यूझीलंड क्रिकेटमध्ये भूकंप, टी20 विश्वचषकापूर्वी धाकड अष्टपैलूने नाकारला केंद्रीय करार