आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champion’s Trophy 2025) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तान-इंग्लंड संघात (7 ऑक्टोबर) पासून 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण रिपोर्टसनुसार या मालिकेचे मीडिया हक्क अद्याप विकले गेले नाहीत. अशा परिस्थितीत दोन्ही संघातील कसोटी मालिका पाकिस्तानबाहेर प्रसारित केली जाणार नाही. कारण पीसीबीने (PCB) मीडिया हक्कांसाठी मोठी मागणी ठेवली आहे.
पाकिस्तान क्रिकेट एका बातमीनुसार पीसीबीने (PCB) तीन वर्षांसाठी मीडिया हक्कांसाठी 21 दशलक्ष डॉलर्सची मागणी केली आहे. भारताच्या दृष्टीने पाहिल्यास ते सुमारे 175 कोटी रुपये असेल. मात्र, एवढी रक्कम देण्यासाठी पीसीबीला अद्याप खरेदीदार मिळालेला नाही. दोन पाकिस्तानी कंपन्यांनी संयुक्तपणे 4.1 दशलक्ष डॉलर्सचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र पीसीबीने हक्क विकण्यास नकार दिला. तर विलोआ टीव्हीने 2.25 दशलक्ष डाॅलर्स ऑफर केले होते.
पीसीबीने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champion’s Trophy) तयारी सुरू केली आहे. पीसीबी स्टेडियम तयार करत आहे. आयसीसीने (ICC) तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकतेच पाच अधिकाऱ्यांचे पथक पाकिस्तानला पाठवले होते. आयसीसीने पीसीबीसमोर 31 जानेवारी 2025 ही तारीख निश्चित केली आहे. याआधी त्यांना सर्व तयारी पूर्ण करावी लागणार आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan And England) यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला सामना (17 सप्टेंबर) पासून मुलतान येथे होणार आहे. दुसरा सामना मुलतान स्टेडियममध्ये (15 ऑक्टोबर) पासून खेळला जाणार आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (24 ऑक्टोबर) पासून रावलपिंडीत रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेश ऐवजी यूएईमध्ये का खेळला जातोय महिला टी20 विश्वचषक? जाणून घ्या भारत-पाकिस्तान सामना कधी होणार
मयंक अग्रवालच्या संघानं जिंकली दुलीप ट्रॉफी, फायनलमध्ये ऋतुराजच्या टीमचा पराभव
रिषभ पंतनं काढली एमएस धोनीची आठवण, चेन्नई कसोटीनंतर माजी कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य