---Advertisement---

वडिलाचे हाल लेकाला बघवले नाहीत, डिव्हिलियर्सला बाद होताना पाहून मुलाचा संताप, व्हिडिओ व्हायरल

On: सोमवार, सप्टेंबर 27, 2021 12:14 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा ३९ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. मुंबई संघाने नाणेफेक जिंकत आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. आरसीबीने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या होत्या. आरसीबीच्या फलंदाजी दरम्यान एक गमतीदार प्रसंग घडला. हा प्रसंग कुणा खेळाडूबाबत नसून आरसीबीचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलर्सच्या लाडक्या मुलाबाबत आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सामन्या दरम्यान १६ व्या षटकात कोहली बाद झाल्यानंतर डिव्हिलर्स फलंदाजीसाठी आला होता. त्याने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ५ चेंडूत एक षटकार आणि एक चौकार ठोकला. मात्र, ६ चेंडूवर तो बाद झाला. जसा तो बाद झाला स्टेडियमच्या गॅलरीत बसलेला त्याच्या लहान मुलाने निराशा प्रकट करत जोरात आपला हात रेलींगवर आपटला. हात आपटल्याबरोबर तो वेदनेने विव्हळतांना दिसला. नेमका या प्रसंगाचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या गोड व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “डिव्हिलर्सचा मुलगा आमच्या सारखाच आहे.”

https://twitter.com/AbdeFansTrends/status/1442155539119570945?s=20

दरम्यान, विराट कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. मॅक्सवेलने आक्रमक खेळी करत ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. एस भरतने ३२ धावांचे योगदान दिले.

आरसीबी आणि मुंबई या दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. दोन्ही संघांनी मागील दोन्ही सामने गमावले आहेत, त्यामुळे त्यांच्या प्लेऑफच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. बेंगलोरने विजय मिळवला असून त्यांनी १२ गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे, तर मुंबई 8 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---