क्रिकेट आता जवळजवळ सर्व देशांमध्ये हळूहळू पोहोचत आहे. खेळांमधली आवड वाढल्यामुळे चाहते खेळाचे नियम जाणून घेण्यातही खूप उत्सुकता दाखवतात. त्यामुळे या बातमीद्वारे आपण क्रिकेटच्या खेळात एक फलंदाज किती प्रकारे बाद होऊ शकतो, हे जाणून घेऊया. तर क्रिकेटमध्ये एक फलंदाज एकूण 10 वेगवेगळ्या प्रकारे बाद होऊ शकतो.
एक फलंदाज या 10 नियमांद्वारे बाद होऊ शकतो
1) बोल्ड- जेव्हा गोलंदाज चेंडू थेट स्टंपावर मारतो, तेव्हा फलंदाज बाद होतो. मात्र, चेंडू नियमानुसार असला पाहिजे. अशी अट आहे.
2) लेग बिफोर विकेट (LBW)- एलबीडब्ल्यू हा बाद होण्याचा प्रकार आहे, ज्याला दुसऱ्या शब्दांत बोल्ड होणे देखील म्हणता येईल. जर एखादा फलंदाज स्टंपसमोर उभा राहिला आणि चेंडू बॅटला न लागता त्याच्या शरीरावर आदळला तर त्याला एलबीडब्ल्यू बाद केले जाते. यामध्ये नियम असा आहे की, ज्या फलंदाजाला चेंडू लागला त्या फलंदाजाच्या शरीराचा भाग स्टंपच्या समोर असावा.
3) धावबाद – जेव्हा फलंदाज 22 यार्डच्या खेळपट्टीवर धावा काढण्यासाठी धावतात तेव्हा त्यांना धावा पूर्ण करण्यासाठी क्रीजच्या आत जावे लागते. जर फलंदाज क्रिजच्या आत पोहोचू शकला नाही आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू स्टंपवर फेकला तर तो धावबाद होतो.
4) स्टंपिंग- फलंदाजाला खेळपट्टीच्या आतच फलंदाजी करावी लागते. शॉट खेळताना जर फलंदाज क्रीझच्या बाहेर गेला आणि जर चेंडू चुकला, यष्टीरक्षकाकडे गेला आणि त्यानं चेंडू स्टंपला लावला, तर फलंदाज स्टंप आऊट होतो.
5) झेलबाद- जेव्हा चेंडू फलंदाजाच्या हाताच्या कोणत्याही भागाला, बॅट किंवा मनगटापर्यंत लागला आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा खेळाडू जेव्हा झेल घेतो तेव्हा त्याला झेलबाद म्हणतात.
6) हिट विकेट- जेव्हा फलंदाज फलंदाजी करताना स्वतःच्या बॅटनं किंवा शरीरानं स्टंपवर मारतो तेव्हा तो बाद होतो. त्याला हिट विकेट म्हणतात.
7) चेंडू दोनदा मारणे- शॉट खेळताना फलंदाज फक्त एकदाच चेंडू मारू शकतो. जर एखादा फलंदाज शॉट खेळण्यासाठी त्याच्या बॅटनं दोनदा चेंडू मारत असेल, तर त्याला बाद घोषित केले जाते.
8) क्षेत्ररक्षण करताना अडथळा आणणे- जर एखाद्या फलंदाजानं क्षेत्ररक्षकासाठी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला, जसे की रन आऊटच्या वेळी क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू थांबवणे किंवा इतर काही, अशा वेळी अंपायर फलंदाजाला बाद देऊ शकतात.
9) टाइम आउट- एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला खेळपट्टीवर पोहोचण्यासाठी ठराविक वेळ असतो. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये हा वेळ 3 मिनिटांचा असतो. या वेळेत जर फलंदाज खेळपट्टीवर पोहोचू शकला नाही, तर त्याला बाद घोषित केले जाते.
10) फलंदाजानं हातानं चेंडू पकडणे- चेंडू खेळण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी फलंदाजाला त्याच्या बॅटचा वापर करावा लागतो. दरम्यान फलंदाज हातानं चेंडू रोखू शकत नाही, जर त्यानं तसं केलं तर अंपायर त्याला बाद घोषित करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिसमधून आनंदाची बातमी; भारताला मिळालं पहिलं सुवर्णपदक
पाकिस्तानची टीम भीकेला; खेळाडूंना द्यायला पैसे नाहीत, कर्ज घेऊन काढलं विमानाचं तिकीट
Champion’s Trophy: “भारतानं पाकिस्तानात येऊ नये” पाकिस्तानी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य