भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. तत्पूर्वी या दोन्ही सामन्यात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे शमी शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे ठीक आहे की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आता समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की, भारतीय संघाला शमीची गरज नाही, तसेच शमी वनडे मालिका खेळताना दिसेल. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरूध्द 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “शमीने दुखापतीपूर्वीच 2 किलो वजन कमी केले आहे. तो पूर्ण तीव्रतेने गोलंदाजी करत आहे. टी20 सामन्यांमध्ये त्याची फारशी गरज नाही. पण वनडे सामने येत असल्याने तो पुन्हा एकदा संघात परतेल.”
मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीदबद्दल बोलायचे झाल्यास, शमीने भारतासाठी 64 कसोटी, 101 वनडे आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. 64 कसोटी सामन्यात त्याने 122 डावात गोलंदाजी करताना 229 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी 118 धावात 9 विकेट्स अशी आहे. 101 वनडे सामन्यात त्याने 195 विकेट्स घेतल्या आहेत. तर 23 टी20 सामन्यात त्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 15 धावात 3 विकेट अशी आहे.
5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल
महत्त्वाच्या बातम्या-
3 भारतीय गोलंदाज, ज्यांनी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये एका सामन्यात दिल्या सर्वाधिक धावा
जोस बटलरचा भीमपराक्रम…! भारताविरूद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज
कोणत्या भारतीय फलंदाजाने प्रजासत्ताकदिनी झळकावले होते शतक?