भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना राजकोट येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 66 धावांनी पराभव पत्करावा लागला. असे असले तरी, मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाने ही मालिका आपल्या नावे केली. सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात भारतीय कर्णधार रोहित शर्माने अशी एक कृती केली ज्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक झाले.
राजकोट येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला 353 धावांचे आव्हान पेलवले नाही. कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी अर्धशतके केली मात्र इतर फलंदाजांची त्यांना पुरेशी साथ लाभली नाही. त्यामुळे भारताला 66 धावांनी पराभूत व्हावे लागले. परंतु भारतीय संघाने मालिकेतील आधीचे दोन सामने खिशात घातले होते. त्यामुळे ही मालिका भारतीय संघाच्या नावे झाली.
सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला मालिका विजयाचे ट्रॉफी घेण्यासाठी आमंत्रित केले गेले. मात्र, रोहित ने मोठ्या मनाने यासाठी केएल राहुल याला पुढे बोलवत त्याच्या हातात ट्रॉफी देण्यास सांगितले. त्याची ही कृती सर्वांना आवडली व त्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात राहुल याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मोहाली व इंदौर येथे झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवलेला. त्यामुळे रोहितने मालिका विजयाचा मान देखील राहुललाच देण्याचा निर्णय घेतला.
या सामन्याचा विचार केल्यास, ऑस्ट्रेलिया संघाने सलामीवीर मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांच्या अर्धशतकांमुळे 352 अशी मोठी मजल मारली. त्याच्या बदल्यात भारतीय संघ केवळ 286 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी चार बळी घेणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीर ठरला. तर, शुबमन गिल याला मालिकावीर पुरस्कार दिला गेला.
(A beautiful gesture by Rohit Sharma He called & asked KL Rahul to hold the trophy as India won the first 2 games under the captaincy of KL Rahul)
महत्वाच्या बातम्या –
कमबॅकसाठी केन विलियम्सन तयार! सराव सामन्याआधी दिली खास प्रतिक्रिया
अखेरच्या वनडेत टीम इंडियाचा दारूण पराभव! ऑस्ट्रेलियाचा सांघिक कामगिरीच्या जोरावर शानदार विजय






