नीरज चोप्राने 7 ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंद संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. त्याच्यावर अनेकांनी विविध स्वरुपात शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव केला. आता भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने (AFI) हा दिवस राष्ट्रीय भाला फेक दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे सांगितले आहे.
23 वर्षीय चोप्रा शनिवारी टोकियोमध्ये 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला. चोप्रा आणि इतर खेळाडूंच्या सत्कार समारंभादरम्यान, एएफआयच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष ललित भानोत म्हणाले, “संपूर्ण भारतभर भालाफेक क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा करू आणि पुढील वर्षापासून मान्यताप्राप्त युनिट्स या दिवशी आपापल्या राज्यात भालाफेक स्पर्धा आयोजित करतील.”
“यानंतर आंतरजिल्हा स्पर्धा होतील आणि आम्ही भाला (बऱ्याच भाल्यांची आवश्यकता असेल) प्रदान करू. येत्या काही वर्षांमध्ये, ही स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा बनवण्यासाठी आम्ही विस्तार करू,”असेही ते म्हणाले.
नीरज चोप्रा म्हणाला, “मला आनंद आहे की, एएफआय येत्या काळात माझे यश लक्षात ठेवण्याचे काम करत आहे. माझ्या कर्तृत्वामुळे या देशातील तरुणांना ॲथलेटिक्स, विशेषत: भालाफेकमध्ये सामील होण्याचा मला आनंद होईल.”
“जर मुलांना भाला आणि इतर सुविधा मिळाल्या तर मला आशा आहे की, ते या खेळात सामील होतील आणि त्यांना प्रोत्साहित करण्यात मला आनंद होईल, ते भावी पदक विजेते ठरू शकतील.” सत्कार समारंभात चोप्राचे वडील सतीश, आई सरोज देवी आणि काका भीम उपस्थित होते.
नीरज चोप्राचे भालफेकमध्ये सुवर्ण पदक
भालाफेकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमधलं भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्या या सुवर्णपदकामुळे तब्बल १३ वर्षानंतरचं म्हणजे २००८ बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भारताचं राष्ट्रगीत वाजलं.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामापूर्वी शुभमन गिलने बदलला आपला पूर्ण लूक, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल
‘धोनीचं नाव नाही घेतलं, तर भारतात मला मारतील’, जेमिमाहच्या अजब उत्तराने वेधले लक्ष