आशिया चषक 2023 चा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघात घेलला जात आहे. ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान संघ सुपर फोरसाठी पात्र झाले आहेत. तर ग्रुप ब मधील क्वॉलिफायर संघ मंगळवारच्या सामन्यानंतर निश्चित होतील बांगलादेश सुपर फोरमध्ये खेळण्यासाठी दावेदार आहे. पण त्याआधीच त्यांचा महत्वाचा खेळाडू आशिया चषकातून बाहेर झाल्याचे समजते. अफगाणिस्तानविरुद्ध या फलंदाजाने शतक केले होते, पण येत्या सामन्यात संघाला आपली सेपा देऊ शकणार नाही.
आशिया चषक 2023चा चौथा सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात झाला होता. मेहदी हसन मिराज (Mehidy Hasan Miraz) आणि नजमूल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) यांच्या महत्वपूर्ण प्रदर्शनामुळे बांगालदेशला या सामन्यात 89 धावांनी विजय मिळाला. नजमूल आणि मेहदी हसन यांनी वैयक्तिक शतके केली होती. पण हे दोन्ही फलंदाज दुखापतग्रस्त देखील जाले होते. लाईव्ह सामन्यात नजमूल हुसेन शांतो याचे हँमस्ट्रिंग दुकावल्याचे पाहायला मिळाले होते. आता याच कारणास्तव शांतो आशिया चषक 2023 अर्ध्यातून सोडत आहे.
बांगलादेश संघाचे फिजिओ बेजेजूल इस्लाम खान यायंनी शांतोच्या दुखापतीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “शांतोने फलंदाजी करत असताना हँमस्ट्रिंगबाबत तक्रार केली होती. यामुळेच तो श्रेतररक्षण करू शकला नाही. आम्ही त्याचा एमआरआय केला आहे, ज्यामध्ये मसल टीयर समोर आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शांतो आशिया चषकातील राहिलेल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही.”
दरम्यान, मंगळवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना निर्णायक ठरणार आहे. श्रीलंकन संघाने ग्रुप स्टेजमधील एक सामना आधीच जिंकला असून सुपर फोरसाठी संघ पात्र झाला आहे. मात्र गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे आणि एक सामना जिंकून देखील त्यांचे सुपर फोरमधील स्थान पक्के नाहीये. अफगाणिस्तानला अद्याप एकही विजय मिळाला नाहीये. पण मंगळवारी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला, तर संघ सुपर फोरसाठी पात्र ठरेल आणि स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट होऊ शकतो. (A big blow to Bangladesh before the start of Super Four! Najmul Hossain Shanto ruled out )
महत्वाच्या बातम्या –
इंडिया विरुद्ध भारत वादावर सेहवागचे मोठे वक्तव्य, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
धक्कादायक! 15 सदस्यीय संघ घोषित करताच बसला झटका, ‘हा’ स्टार खेळाडू World Cupनंतर होणार निवृत्त