मुंबई इंडियन्सच संघाच्या संघमालक नीता अंबानी यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबानी यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’च्या बाहेर स्फोटके असलेली कार आढळून आली आहे. या कारमध्ये जिलेटिन स्फोटकांच्या कांड्या असल्याचे निदर्शनास आले. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडल्याचे कळते. तसेच या कारमध्ये ‘मुंबई इंडियन्स’ असे नाव असलेली एक बॅग देखील सापडली आहे.
या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून अंबानींच्या घराभोवतीची सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
या घटनेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका ध्वनीचित्रफितीद्वारे सदर घटना घडल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली. तसेच मुंबई पोलीस याचा अधिक तपास करत असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “जिलेटिन कांड्या असलेली एक स्कोर्पिओ कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सत्य लवकरच बाहेर येईल.”
पोलिसांच्या माहितीनुसार या कारमध्ये एकूण जवळपास २० जिलेटिन स्फोटकांच्या कांड्या आहेत. ज्या मोठा स्फोट घडवण्याची क्षमता राखत होत्या. या कारचा तपास करणाऱ्या पोलिसांनी कारचा रजिस्ट्रेशन नंबर अंबानींच्या सुरक्षा ताफ्यातील एका नंबरशी मिळताजुळता आहे. मात्र तो धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
महत्वाच्या बातम्या:
खरंच अहमदाबाद कसोटीची खेळपट्टी होती खराब? जाणून घ्या काय आहेत आयसीसीचे नियम
दोन दिवसात कसोटी जिंकताच ट्विटरवर भारतीय संघासाठी आला कौतुकाचा पूर, पाहा काही हटके ट्विट