न्यूझीलंडचा फलंदाज जेसी रायडर एक प्रतिभाशाली क्रिकेटपटू होता. एकवेळी न्यूझीलंडचा भरवशाचा सलामीवीर फलंदाज म्हणून रायडरकडे पहिले जायचे. पण प्रतिभाशाली असूनही दारुच्या व्यसनामुळे रायडरचे कारकिर्दीत प्रचंड नुकसान झाले.
बरोबर ७ वर्षांपूर्वी २०१३मध्ये रायडर कोमात गेला होता. त्याला त्यावेळी क्राईस्टचर्च येथील एका बारमध्ये काही लोकांनी मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात २ व्यक्तींना अटकही केली होती. रायडर यामुळे ३ दिवस कोमात होता.
त्यानंतर आठवड्याभराने त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. ख्राईस्टचर्चमधील बारमध्ये दुखापतग्रस्त होण्याची रायडरची ही पहिलीच वेळ नव्हती. त्याआधीही २००८ ला त्याला खिडकीच्या काचेमुळे दुखापत झाली होती.
तसेच याचवर्षी काही दिवसांपूर्वी रायडरचा नेपियर जिल्हा न्यायालयाने मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवल्याबद्दल २८ दिवसांसाठी वाहन परवाना रद्द केला आहे.
७ फेब्रुवारीला ३५ वर्षीय रायडरने दारू पिऊन गाडी चालवली होती. काही वृत्तांनुसार त्याला जेव्हा दारु पिऊन गाडी चालवताना पकडले, तेव्हा त्याने मर्यादेपेक्षा ३ पट अधिक दारु पिली होती. त्यानंतर त्याच्यावर केस करण्यात आली.
त्यामुळे त्याला नेपियर जिल्हा न्यायालयाने ९ महिने देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याला दारु सोडवण्यासाठी समुपदेशन घेण्यासह सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त त्याला २८ दिवस गाडी न चालवण्यासही सांगण्यात आले आहे.
जेसी रायडरने २००८ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १८ कसोटी आणि ४८ वनडे सामने खेळले. कसोटीत त्याने ४०.९३च्या सरासरीने १२६९ धावा केल्या. यात त्याच्या ३ शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही शतके त्याने भारताविरुद्ध केली आहेत. त्याने २००९ मध्ये भारताविरुद्ध द्विशतकही केले होते.
तसेच वनडेमध्ये रायडरने ३३.२१ च्या सरासरीने १३६२ धावा केल्या आहेत. ज्यात ३ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
पण दारुच्या व्यसनामुळे त्याला कारकिर्दीत मोठे नुकसात झाले. २०१४ नंतर त्याला न्यूझीलंड संघात स्थानही मिळालेले नाही.
ट्रेडिंग घडामोडी –
कोरोनाविरुद्धच्या लढाईत एमएस धोनी आला पुणेकरांच्या मदतीला धावुन
–जर आयपीएल झाली नाही तर मी कंगाल होईल
हे ४ खेळाडू जेव्हा निवृत्त होतील तेव्हा संपुर्ण देश रडेल
४ वर्षांपुर्वी कोहलीचे त्याला किंग कोहली का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं
टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये विजयांचा डोंगर उभे करणारे ५ कर्णधार