ग्लासगो: भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने स्विझरलँडच्या साब्रीना जॅकइट हीचा २१-११,२१-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह साईनाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पहिल्या सेटच्या सुरुवातीपासू साईनाने सामन्यावर वर्चस्व स्थापन केले. तिने सुरुवातीलाच ६-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर विरोधी खेळाडूला फारशी संधी न देता तिने हा सेट २१-१२ असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला साईनाने ५-२ अशी बढत मिळवली. त्यानंतर ही बढत वाढवत तिने ११-७ अशी केली. विरोधी खेळाडूच्या लॉन्ग रॅलीजच्या खेळाला सायनाने संयमाने उत्तर देत बाढत १५-९ अशी केली. हा सेट साईनाने २१-११ असा जिंकला.
साईना मागील वर्षांपासून दुखापतींचा सामना करत आहे. त्यामुळे मागील वर्षात तिला मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवत आलेले नाही. दुखापतीच्या समस्यांवर मात करत तिने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.