भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुबमन गिलला (Shubman Gill) अनेकदा पुढचा विराट कोहली (Virat Kohli) म्हटले जाते. याचे कारण म्हणजे या दोघांची फलंदाजी शैली जुळते असे नाही. कोहलीनं अनेकदा गिलचं कौतुक केलं आहे. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कोहली स्वत:ला तेंडुलकर नंतर भारताचा सर्वोत्तम क्रिकेटर म्हणत आहे. गिलशी तुलना केल्यास, तो म्हणत आहे की हे सर्व साध्य करणं त्याच्यासाठी सोपं नाही.
कोहलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा आहे. हा एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. कोहली या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, “जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाहून परतलो, तेव्हा मी यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचे आकलन केले. गिलला मी जवळून पाहत आलो आहे. त्याच्या टॅलेंटबद्दल शंका नाही पण टॅलेंट दाखवणं आणि लीजेंड बनणं यात खूप फरक आहे.”
पुढे बोलताना कोहली या व्हिडिओमध्ये म्हणतो, “गिलची फलंदाजी शैली उत्कृष्ट आहे, पण त्याला आपल्यापेक्षा पुढे ठेवण्याची गरज नाही. लोक पुढच्या कोहलीबद्दल बोलत आहेत, पण मला हे स्पष्ट करायचं आहे की एकच विराट कोहली आहे. मी सर्वात धोकादायक गोलंदाजांचा सामना केला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे आणि एक दशकाहून अधिक काळ सातत्यानं अशी कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये एक ‘देव’ (सचिन तेंडुलकर) आहे आणि त्याच्यानंतर मी आहे. हा एक बेंचमार्क आहे. गिलला तिथे पोहोचण्याआधी खूप मोठी कामगिरी करायची आहे.
AI is Dangerous pic.twitter.com/njUvwiwc4t
— Cricketopia (@CricketopiaCom) August 27, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचं ट्विटर अकाऊंट हॅक! रोनाल्डो, मेस्सीवरील वादग्रस्त पोस्ट व्हायरल
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंड ताफ्यात नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाची एँट्री
विचित्रच; टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूनं स्कूटर चालवण्यासाठी ठेवलं चक्क ड्रायव्हर