आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने आत्तापर्यत चार सामने खेळले आहेत. या चारही सामन्यात 42 वर्षीय फिरकीपटू इम्रान ताहिरला एकाही सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. याबाबत त्याला एका चाहत्याने प्रश्न विचारला होता, त्याला ताहिरने उत्तर दिले आहे.
चाहत्याने ताहिरला प्रश्न विचारला होता की ‘आम्ही तुम्हाला चेन्नईच्या अंतिम 11 जणांच्या संघात खेळताना कधी पाहू शकतो.’
या प्रश्नाचे उत्तर देताना ताहिरने ट्विट केले आहे की ‘सध्या संघात सर्वोत्तम खेळाडू असून ते मैदानावरही चांगली कामगिरी करत आहेत. परंतु जेव्हा संघाला माझी गरज पडेल तेव्हा मी नक्कीच चांगली कामगिरी करेन. तसेच आयपीएलमध्ये सीएसके संघात असल्याचा मला खूप अभिमान आहे.’
Thank you https://t.co/CwOFkDXgPq players are in the field and they are delivering and they should continue for the teams benefit.Its not about me.Its about the team.Iam extremely proud to be a part of this wonderful team.If Iam needed sometime I will give my best for the team https://t.co/Wh6PJ0dYHV
— Imran Tahir (@ImranTahirSA) April 19, 2021
आयपीएल 2018 च्या लिलावामध्ये सीएसकेने ताहिरला आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 58 सामने खेळले असून यामध्ये 16.15 च्या शानदार स्ट्राइक रेटने 80 बळी मिळवले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने सीएसकेकडून एकूण 26 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये एकूण 33 बळी घेतले आहेत. तो आयपीएलमध्ये शेवटी 1 नोव्हेंबर 2020 रोजी खेळला होता. हा सामना चेन्नई आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये युएईमध्ये झाला होता. त्या सामन्यात त्याने 4 षटकांत 24 धावा देऊन ख्रिस गेलचा बळी मिळवला होता. तसेच 2019 सालच्या आयपीएलमध्ये ताहिर सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्या हंगामात त्याने 26 बळी मिळवत पर्पल कॅप जिंकली होती.
आयपीएल 2021 मध्ये चेन्नई संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघाने यानंतरचे तीन्ही सामने जिंकले आहेत. यामध्ये त्यांनी केएल राहुलच्या पंजाब किंग्स संघाचा आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाचा तसेच ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”
चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम
माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा