‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’च्या (Border Gavaskar Trophy) चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ मेलबर्नला पोहोचला आहे. तिथे बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारत कसून सराव करत आहे. भारतीय संघाचे चाहतेही सरावाला पोहोचून आपल्या आवडत्या खेळाडूंच्या नावाचा जल्लोष करत आहेत. ते त्यांच्या आवडत्या खेळाडूंनाही पाहत आहेत आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील करत आहेत.
असाच एक चाहता मेलबर्नमध्ये भारतीय संघाच्या सराव सत्राला पोहोचला. त्याला ‘शुबमन गिल’ला (Shubman Gill) भेटायचे होते. पण गिल तिथे नव्हता. तर या चाहत्याने असे काही केले जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही. हा चाहता भारतीय संघाच्या नेटजवळ पोहोचला आणि भारतीय कर्णधार ‘रोहित शर्मा’ला (Rohit Sharma) शुबमन गिलला फोन करण्याची विनंती करू लागला.
रोहितने चाहत्याला हाताने इशारा केला की गिलने सराव संपवला आहे. त्याचे सराव सत्र संपले असून तो नेटच्या बाहेर गेला आहे. पण तो चाहता मानायला तयार नव्हता. ती वारंवार रोहितला शुबमनला फोन करायला सांगू लागली. अखेर रोहित या गोष्टीने थोडा चिडला. रोहित म्हणाला, “कुठून आणू?”
रेव्ह स्पोर्ट्सशी बोलताना हा चाहता म्हणाला, “माझा पाय तुटला आहे. मी इथे पट्टी बांधून आलो आहे. काल मला त्याची थोडीशी झलक दिसली. पण रडायला लागल्याने मी काहीच बोलू शकलो नाही. आज माझ्या दुखापतीमुळे मी थोडा उशीरा पोहोचलो. त्यामुळेच मी शुबमनला भेटू शकलो नाही. त्याने पुनरागमन करावे अशी माझी इच्छा आहे.”
Courtesy: RevSportz pic.twitter.com/TtTAYfgqgy
— Nihari Korma (@NihariVsKorma) December 24, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी: आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! या दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान मुकाबला
IND vs AUS; गिल, पंत, जयस्वालबद्दल कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य! म्हणाला….
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फिट झाला हा मॅचविनर गोलंदाज