---Advertisement---

लॅब्यूशेनला गोलंदाजी करणे म्हणजे क्लबमधील एखाद्या मुलीला इंप्रेस करण्यासारखे, अँडरसनची अजब प्रतिक्रिया

---Advertisement---

इंग्लंडमध्ये सध्या काऊंटी क्रिकेटचा हंगाम सुरु आहे. दरम्यान, नुकतेच लँकाशायर विरुद्ध ग्लॅमॉर्गन संघात सामना झाला. या सामन्यात लँकाशायरकडून खेळताना दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने ग्लॅमॉर्गनकडून खेळणाऱ्या मार्नस लॅब्यूशेनला १२ धावांवर यष्टीमागे झेल द्यायला भाग पाडत बाद केले. ही विकेट घेतल्यानंतर अँडरसनने एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

अँडरसनने लॅब्यूशेनची विकेट घेतल्याबद्दल बीसीसी पॉडकास्टमध्ये म्हटले की ‘तुम्हाला प्रभाव पाडण्याची इच्छा असते आणि त्या लढाईत आपला अधिकार प्रस्थापित करण्याचीही इच्छा असते. पहिला धक्का देणे चांगले असते. मी कधीही त्याला (लॅब्यूशेन) गोलंदाजी केली नव्हती. हे एकप्रकारे असे की तुम्ही एखाद्या क्लबमध्ये कोणत्यातरी मुलीला पाहाता आणि तिच्यासमोर कूल बनण्याचा प्रयत्न करता. तुमची इच्छा असते की ती प्रभावित व्हावी. तुम्ही नाचण्यास सुरुवात करता जेव्हा की तुमचे शुज फरशीवरच चिटकून राहातात.’

अँडरसन-लॅब्युशेन पहिल्यांदाच आमने-सामने
खरंतर अँडरसन इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज आहे. पण २०१९ मधील ऍशेस मालिकेतील सामन्यांना त्याला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. याच मालिकेत लॅब्यूशेनने स्टिव्ह स्मिथचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरत कमालीची कामगिरी केली होती. तेव्हापासून लॅब्यूशेनने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याची गेल्या २ वर्षातील कामगिरी अफलातून राहिली आहे.

मात्र, अँडरसन आणि लॅब्यूशेन आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमने-सामने आले नाहीत. पण काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ते आमने-सामने आले. यात अँडरसनने बाजी मारली असून त्याने लॅब्यूशेनला बाद केले.

आता हे दोघे लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आमने-सामने येऊ शकतात. कारण या वर्षाच्या अखेरिस ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिकेला सुरुवात होणार आहे.

लॅब्यूशेनची कसोटी कारकिर्द 
लॅब्यूशेनने कसोटी कारकिर्दीतल आत्तापर्यंत १८ सामने खेळले असून ६०.८० च्या सरासरीने १८८५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. २१५ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. याशिवाय त्याने गोलंदाजी करताना १२ विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१ हंगामात ‘हा’ संघ चॅम्पियनसारखा दिसला, गावसकरांनी केले कौतुक

WTC Final: खरंच का; ‘भूवी’ची भारतीय कसोटी संघात निवड न होण्यामागे त्याचाच हात!

एका ट्विटमुळे गौतमपुढे उभारली ‘गंभीर’ समस्या, आला दिल्ली पोलिसांच्या रडारवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---