---Advertisement---

स्वागत तर व्हायलाच हवं! झुंजार द्विशतकानंतर जो रुटचे ड्रेसिंग रुममध्ये जल्लोषात वेलकम, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, जानेवारी 16, 2021 6:18 PM
---Advertisement---

इंग्लंड संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून दोन्ही संघात गुरुवारपासून (१४ जानेवारी) पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव ४२१ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडच्या या भल्यामोठ्या धावसंख्येत कर्णधार जो रुट याच्या झुंजार द्विशतकाचा मोठा वाटा राहिला. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोषात त्याचे स्वागत केले.

इंग्लंड क्रिकेटने इंग्लंड क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत जो रुट बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परत असल्याचे दिसत आहे. तो ड्रेसिंग रुमच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर तिथे उपस्थित सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवत त्याचे स्वागत केले.

त्यानंतर रुट बसून आपले पायावरील क्रिकेट पॅड काढत असताना फलंदाज जॉनी बेयरस्टो त्याच्याशी हात मिळवत त्याचे कौतुक करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडची पहिल्या डावाच २८६ धावांनी आघाडी

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे १३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचे सलामीवीर अवघ्या १७ धावांवरच पव्हेलियनला परतले. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोही ४७ धावांची खेळी करत झेलबाद झाला.

पुढे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३० वर्षीय जो रुटने पैसावसूल फलंदाजी प्रदर्शन केले. ३२१ चेंडूत ७१.०३च्या स्ट्राईक रेटने त्याने २२८ धावा केल्या. यात त्याच्या १८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अखेर श्रीलंकाचा गोलंदाज दिलरुवान परेरा याने रुटला झेलबाद केले. परंतु त्याच्या धुव्वादार द्विशतकी खेळीमुळे इंग्लंड संघाने पहिल्या डावात २८६ धावांची आघाडी मिळवली आहे.

तिसऱ्या दिवसाखेर श्रीलंका संघ २ बाद १५६ धावांवर आहे. श्रीलंकाकडून लहीरु थिरीमन्ने आणि लसिथ इम्बलडेनिया फलंदाजी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

द्विशतक एक विक्रम अनेक! वाचा श्रीलंकाविरुद्ध डबल सेंचूरी करत जो रुटच्या नावावर झालेले रेकॉर्ड्स

डावखुऱ्या नटराजनचा पहिल्याच कसोटी सामन्यात भेदक मारा, ३ ऑसी फलंदाजांना बाद करत मिळवला ‘मोठा’ किर्तीमान

कसोटी चॅम्पियनशिप : फॅब फोरसह आत्तापर्यंत ‘या’ फलंदाजांनी केलीत द्विशतके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---