पुणे (21 मार्च 2024) – आजच्या दिवसाचा तिसरा सामना मुंबई शहर विरुद्ध अहमदनगर यांच्यात झाला. अहमदनगर संघाने प्रमोशन फेरीतील 2 सामने जिंकले होते. तर मुंबई शहर ने दोन्ही सामने गमावले होते. अहमदनगर संघाने जोरदार सुरुवात करत सामन्यात आघाडी मिळवली होती. जतिन विंदे ने चपळाईने खेळ करत मुंबई शहर ला गुण मिळवून दिले. अहमदनगर कडून आशिष यादव व शिवम पठारे यांनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले.
अहमदनगर संघाने मध्यंतराला 16-11 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरा नंतर अहमदनगर संघाने मुंबई शहर ला ऑल आऊट करत 23-12 अशी आघाडी मिळवली. अहमदनगर आपला आक्रमक खेळ कायम ठेवत सामन्यावर पकड मिळवली. अहमदनगर आशिष यादव ने सुपर टेन पूर्ण करत संघाचा विजय सोपा केला. अहमदनगर संघाने पुन्हा एकदा मुंबई शहर ला ऑल आऊट करत सामना आपल्या नावे केला.
अहमदनगर संघाने 44-21 असा मुंबई शहर वर विजय मिळवत प्रमोशन फेरीत विजयाची हट्रिक साधली. अहमदनगर संघाकडून आशिष यादव ने अष्टपैलू खेळी करत सर्वाधिक 17 गुण मिळवले. तर शिवम पठारे ने 7 गुण मिळवले. अभिषेक मापारी ने पकडीत एकूण 6 गुण मिळवले. संकेत खलाटे ने 3 तर सोमनाथ बेडके ने पकडीत 2 गुण मिळवले. मुंबई शहर कडून जतिन विंदे ने 11 गुण मिळवले. मुंबई शहराचा हा प्रमोशन फेरीतील सलग तिसरा पराभव ठरला. (A hat-trick of wins for Ahmednagar team in the promotion round)
बेस्ट रेडर- आशिष यादव, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- अभिषेक मापारी, अहमदनगर
कबड्डी का कमाल – जतिन विंदे, मुंबई शहर
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत अहमदनगर, पालघर व कोल्हापूर संघांचा सलग दुसरा विजय
प्रमोशन फेरीत कोल्हापूर संघाची विजयाची हट्रिक